चित्रपटसृष्टी ही एक वेगळीच दुनिया आहे. जिथे काही कलाकार एका रात्रीच सुपरस्टार बनवतात तर काहींच्या पदरी मात्र अपयशच पडतं. तुम्हाला एका अशा कलाकाराबद्दल सांगणार आहोत ज्याने या चित्रपट सृष्टीत चांगलं काम केलं मात्र आता त्याच्यावर उदरनिर्वाह करण्यासाठी वॉचमनची नोकरी करण्याची वेळ आली आहे.
एक अभिनेता ज्याने अक्षय कुमार सह ऋषी कपूर सारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलंय, आज त्याच्यावर वॉचमनची नोकरी करण्याची वेळ आली. या अभिनेत्याचं नाव सावी सिद्धू असून त्याने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये लहान मोठ्या भूमिका केल्या आहेत. यासह त्याने अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलंय.
लखनऊमध्ये जन्मलेल्या सावीचं स्वप्न कधी मॉडलिंग करण्याचं होतं, यासाठी आपलं नशीब आजमावण्याकरता तो चंदीगडमध्ये आला. तसेच अभिनेता म्हणून काम करताना त्याने काही नाटकांमध्ये सुद्धा काम केलं.
सावीने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं. त्याच्या करिअरची सुरुवात ही 1995 मधील 'ताकत' या चित्रपटापासून झाली ज्यात अनुराग कश्यपला त्यांचं काम आवडलं. अनुराग कश्यपने नंतर सावीला ब्लॅक फ्राइडे' (2007) आणि 'गुलाल'(2009) सारख्या चित्रपटांमध्ये साइन केलं.
सावी सिद्धूने वर्ष 2013 मध्ये विष्णुवर्धन दिग्दर्शित आरंभम चित्रपटामध्ये दहशतवादी ग्रुपच्या सदस्याची भूमिका केली होती. त्याने 'मस्का' (2020) मध्ये सुद्धा भूमिका निभावली होती. त्याने 'पटियाला हाउस' (2011), 'डे डी' (2013), आणि 'बेवकूफियां' (2014) सारख्या चित्रपटांमध्ये सुद्धा कामं केली आहेत.
सावी सिद्धूचा शेवटचा चित्रपट 'मस्का' ठरला. या चित्रपटानंतर तो कोणत्याही चित्रपटात दिसला नाही आणि थेट अंधेरी वेस्टच्या लोखंडवाला येथील इमारतीमध्ये सिक्यॉरिटी गार्डची भूमिका करताना दिसला.
'फिल्म कंपेनियन' ने त्याच्या सोबत बातचीत केली आणि यात त्याला विचारलं की तो अचानलपणे चित्रपट सृष्टीतून बाहेर का पडला? यावर त्याने सांगितलं की, 2019 मध्ये मी माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण गोष्टीतून गेलं त्यावेळी मी माझी पत्नी आणि आई वडिलांना गमावलं आणि मी एकटाच राहिलो. मी आता अगदी एकटा आहे.
सावीने सांगितलं की, वॉचमन काम करताना खूप मेहनत लागते आणि अनेकदा 12 तासाच्या वर काम करावं लागत. माझ्याकडे बसचं तिकीट खरेदी करण्याइतके सुद्धा पैसे नाहीत. त्याने एवढं सुद्धा सांगितलं की, आता थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणं माझ्यासाठी एका स्वप्नाप्रमाणे आहे.
अभिनेता सावी सिद्धूने ब्लॅक फ्राइडे, गुलाल, ताकद, पटियाला हाउस, डे डी आणि बेवकूफियां या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.