विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. 'छावा' चित्रपटाने बॉलिवूडच्या टॉप 5 चित्रपटांमध्ये प्रवेश केला आहे.
विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट बॉलीवूडच्या टॉप 5 चित्रपटांमध्ये प्रवेश केला आहे.
14 फेब्रुवारीला विकी कौशलचा 'छावा' चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास एक महिना पूर्ण होईल.
या चित्रपटाने महिनाभरात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. सर्वात जास्त कमाई करणाऱ्या टॉप 5 चित्रपटांमध्ये शाहरूख खानचा 'जवान' चित्रपट आहे.
या चित्रपटाने 640.25 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. तर दुसऱ्या नंबरवर 'स्त्री-२' चित्रपट आहे. या चित्रपटाने 597.99 कोटी रुपये कमावले.
तिसऱ्या स्थानावर 'अॅनिमल' चित्रपट असून या चित्रपटाने 553.87 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर चौथ्या नंबरवर 'पठाण' आहे. 'पठाण' या चित्रपटाने 543.09 कोटी रुपयांची कमाई केली.
सैक्निल्कच्या रिपोर्टनुसार, विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने 28 दिवसांमध्ये 551.14 कोटींची कमाई केली आहे. यामध्ये बदल होऊ शकतो.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटात विक्की कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. तर अक्षय खन्नाने औरंगजेबची भूमिका साकारली आहे.