Bollywood Facts : थोडक्यात आपल्या प्रत्यक्ष वयाहून जास्त वयाच्या भूमिका स्वीकारत आणि ताकदीनं साकारत या कलाकारांनी प्रेक्षकाच्या मनावर कायमस्वरुपी भुरळ पाडली आहे.
'सारांश' या चित्रपटामध्ये अनुपम खेर यांनी साकारलेली वयोवृद्ध वडिलांची भूमिका कोणीही विसरु शकलेलं नाही. यावेळी त्यांचं वय 20 वर्षांहून काहीसंच जास्त होतं.
बिग बी अमिताभ बच्चन यांनी 66 व्या वर्षी एका 12 वर्षाच्या मुलाची भूमिका साकारली होती. वयाच्या आकड्याच्या तुलनेत त्यांनी साकारलेली ही भूमिका विशेष गाजली होती.
'अलिगढ' या चित्रपटामध्ये मनोज बाजपेयीनं त्याच्या वयाहून साधारण 15 ते 20 वर्षे जास्तीची भूमिका साकारली होती. या भूमिकेला कमालीची समीक्षक पसंती मिळाली होती.
अभिनेते ऋषी कपूर यांनी 'कपूर अँड सन्स' चित्रपटामध्ये एका आजोबांची व्यक्तीरेखा साकारली होती. त्यावेळी त्यांचं खरं वय होतं 63 वर्षे.
अभिनेत्री रिचा चड्ढानं 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटामध्ये साकारलेली नगमा खातून तिच्या वयाच्या पल्ल्याड होती. रिचानं ही भूमिका अवघ्या 26 व्या वर्षी साकारली होती.
अभिनेत्री नर्गिस यांनी 'मदर इंडिया' चित्रपटामध्ये तारुण्यावस्थेसोबतच वयोवृद्ध भूमिकाही साकारली होती. यावेळी त्यांचं वय होतं 28 वर्षे.
अभिनेत्री राखी यांनी 'शक्ती' चित्रपटात साकारलेली भूमिका आठवतेय? ही भूमिका साकारली तेव्हा राखी यांचं वय होतं 35 वर्षे.
अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी 'अग्निपथ' चित्रपटामध्ये साकारलेली बिग बींच्या आईची भूमिका त्यांच्या वयाहून कैक वर्षे मोठी होती. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी 'कस्तुरबा' ही भूमिका साकारली तेव्हाही त्यांचं वय अवघी 27 वर्षे इतकंच होतं.