Guess The Actress: काही महिन्यांपूर्वीच या अभिनेत्रीचं ब्रेकअप झालं होतं. मात्र आता ती हळूहळू पुन्हा आपल्या व्यक्तिमत्त्वावर लक्ष केंद्रित करत आहे. अलीकडेच तिने तिचं लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं असून, या फोटोंमधील तिच्या खास अदाकारीवर चाहते फिदा झाले आहेत.
बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वीच तिचं अभिनेता विजय वर्मासोबतचं नातं संपुष्टात आलं होतं. त्या ब्रेकअपनंतरही तमन्नाने स्वतःला संभाळत, पुन्हा एकदा करिअर आणि लूकवर फोकस करायला सुरुवात केली आहे.
अलीकडेच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटोशूट शेअर केलं आहे, ज्यात तिचा ग्लॅमरस आणि बोल्ड लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहता स्पष्ट होतंय की तमन्नाचा हा लूक लोकांच्या मनावर राज्य करतो आहे.
ब्रेकअपनंतर तिने स्वतःच्या फिटनेसवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. तिचं वजन कमी झाल्याचंही या फोटोंमधून स्पष्टपणे जाणवतं. पूर्वीच्या तुलनेत तिच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारचा कॉन्फिडन्स आणि ग्लो दिसतो, ज्यामुळे ती अधिकच आकर्षक वाटत आहे.
हे खास फोटोज मनीष मल्होत्राच्या पार्टीदरम्यान क्लिक करण्यात आले होते. त्या पार्टीत उपस्थित असलेल्या अनेक सेलिब्रिटींपेक्षा तमन्नाचा लूक अधिक चर्चेत राहिला.
तिने परिधान केलेला सोनेरी पिवळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर गाऊन तिच्या स्टाईलला उठावदार बनवत होता. हा गाऊन इनाया कलेक्शनचा असून तिच्या व्यक्तिमत्त्वाला एक रॉयल आणि एलिगंट टच देत होता.
'मनीष मल्होत्रा, तुझा ग्लॅमर हा एक अनुभव आहे आणि तुझी कॉउचर पार्टीही तशीच होती. किती सुंदर रात्र होती ती! इनाया म्हणजेच एक सुंदर कविता आहे. तुझ्यासारखं ग्लॅमर कोणीच करू शकत नाही.'
फोटोंवर चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिले आहे. अनेकांनी तिच्या या लूकचं कौतुक करताना तिला 'गोल्डन ग्लॅम', 'ब्रेकअपनंतर तर आणखीच सुंदर झाली आहेस', 'हा लूक तर थेट चित्रपटासाठी हवा होता' अशा कमेंट्स केल्या आहेत.
तमन्ना भाटियाने गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या भाषांतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'बाहुबली', 'देवी', 'फुडिया' आणि 'एंटरटेनमेंट' सारख्या चित्रपटांनी तिच्या करिअरला मोठा टर्निंग पॉइंट दिला. सध्या ती काही महत्त्वाच्या हिंदी आणि साऊथ प्रोजेक्ट्समध्येही काम करत असल्याची चर्चा आहे. तमन्ना चे स्त्री 2 चित्रपटातील आज की रात हे गाणे देखील व्हायरल झाले होते.
अभिनेत्रीचं हे फोटोशूट इंटरनेटवर झपाट्याने व्हायरल होत असून, काही तासांतच लाखो लाईक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत. तिच्या स्टाईल आणि सौंदर्यावर पुन्हा एकदा चाहते भुरळले आहेत.