di Villagers: सध्या इरसालवाडीतील दुर्घटनेनंतर सगळीकडूनच हळहळ व्यक्त केली जाते आहे सोबतच यावेळी आता तिथे योग्य प्रकारे मदत पोहचावी म्हणू...
जूलै महिन्यात अत्यंत वाईट घडलेली घटना म्हणजे इरसालवाडीची. यावेळी या घटनेनं सर्वत्रच शोक व्यक्त केला जातो आहे. यावेळी सर्वत्र ठिकाणाहून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
यावेळी अनेकांना सुखरूप बचावण्यात यशही आले आहे परंतु दुर्दैवानं काही लोकांना आपला जीवही गमावावा लागला आहे. यावेळी एका अभिनेत्रीनंही या ग्रामस्थांसाठी मदत केली आहे.
अभिनेत्री जूई गडकरीचे आपण सर्वचजण फॅन्स आहोत. 'पुढचं पाऊल' या मालिकेतून ती घराघरात पोहचली होती. आता 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येते आहे.
यावेळी तिनंं एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिनं इरसालवाडीतील ग्रामस्थांसाठी मदत दर्शवली आहे. त्यामुळे सध्या तिचे सर्वत्र कौतुक होते आहे.
तिनं इन्टाग्राम स्टोरी मध्ये लिहिलं आहे की, ''इरसालवाडीसाठी मदत पाठवायची असल्यास कृपया मला मेसेज करा. पंचे, चादरी, औषधे, कपडे, चपला, जेवण इत्यादी जीवनावश्यक वस्तू इर्शाळवाडीपर्यंत माझ्या टीमकडून पोहोचवल्या जातील…'' (Jui Gadkari Instagram)