थोडक्यात सांगावं तर, बी टाऊनमध्ये अशा काही जोड्या आहेत ज्यांनी लग्नाच्या नात्यात दुरावा आल्यानंतर लगेचच आपल्या अफेअर्सना जगासमोर आणलं आहे (Bollywood Celebrity Affairs).
अभिनेता (saif Ali khan) सैफ अली खान, यानं अमृता सिंगपासून विभक्त झाल्यानंतर काही वर्षांनी करीना कपूर हिच्याशी लग्नगाठ बांधली. दरम्यानच्या काळात त्याचे काही अफेअर्सही चर्चेचा विषय ठरले.
मेहर जेसियासोबत लग्नाच्या नात्यातून बाहेर पडल्यानंतर अर्जुन रामपालनं गॅब्रिएला या मॉडेलसोबतचं नातं जगासमोर आणलं. सध्या तो तिच्यासोहत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. (Arjun Rampal)
अभिनेत्री (Bipasha Basu) बिपाशा बासू आणि जॉन अब्राहम लग्नाच्या बेडित अडकणार असं वाटत असतानाच त्यांचं नातं तुटलं. पुढे बिपाशानं करण सिंह ग्रोवरशी लग्न करत संसार थाटला.
अभिनेता (Farhan Akhtar) फरहान अख्तर याचं पहिलं लग्न सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट अधुना अख्तरशी झालं होतं. पण, हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. मागील वर्षीच फरहाननं मॉडेल आणि प्रेझेंटर शिबानी दांडेकर हिच्याशी नव्यानं आयुष्याला सुरुवात केली.
(Hritik Roshan) अभिनेता हृतिक रोशन आणि सुझॅन खानचं लग्न तुटणं हे सर्वांसाठीच धक्कादायक होतं. सध्या ही दोघंही त्यांच्या नव्या पार्टनर्ससोबत म्हणजेच हृतिक सबा आझादसोबत आणि सुझॅन अर्सलान गोनीसोबत आनंदात आहे.
(Malaika Arora) मलायका अरोरा आणि अरबाज खान (Arbaz khan) या दोघांनीही त्यांच्या नात्याच्या बाबती असंच केलं. 19 वर्षांच्या वैवाहिक नात्याला तडा गेल्यानंतर मलायकानं अर्जुन कपूरसोबतचं नातं अतिशय काळजीनं जगासमोर आणलं.