PHOTOS

टेरेस, पाऊस अन् निळ्या साडीत चिंब भिजलेली ती... Photoshoot चर्चेत; चाहते म्हणाले, 'मराठीतील प्रियंका चोप्रा'

Actress Monsoon Special Terrace Photoshoot: या मराठमोळ्या अभिनेत्रीने पोस्ट केलेले फोटो पाहून चाहते नव्याने तिच्या प्रेमात पडल्याचं कमेंट सेक्शन पाहता क्षणी समजते. अनेकांनी तिचे हे फोटो पाहून कमेंटमध्ये चारोळ्या आणि कविता पोस्ट केल्यात. यापैकी एका कमेंटला तर तिने स्वत: रिप्लाय दिलाय. पाहा हे व्हायरल झालेले आणि चर्चेत असणारे फोटो...

Advertisement
1/10

सौंदर्यवतींच्या एका स्पर्धेतून समोर आलेली आणि सध्या अनेकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत!

 

2/10

पूजा सोशल मीडियावरुन चाहत्यांशी कनेक्ट असते. आपल्या फोटोशूटपासून ते अगदी भटकंतीपर्यंतचे फोटो ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. 

 

3/10

इन्स्टाग्रामवर बरीच सक्रीय असलेल्या पूजाने स्वत:चे काही पावसात भिजतानाचे फोटो शेअर केले असून हे फोटो सध्या चर्चेत आहेत.

 

4/10

या फोटोंमध्ये पूजा गडद निळ्या रंगाची साडी आणि काळ्या रंगाचं स्लीव्हलेस ब्लाऊज अशा पेहरावात दिसत आहे.

 

5/10

'वर्षाऋतू' अशी एका शब्दाची कॅप्शन या फोटोंना पूजाने दिलेली आहे. 

 

6/10

पूजाचे हे फोटो एका गच्चीवर शूट करण्यात आल्याचं फोटोतून स्पष्ट होत आहे.

 

7/10

पूजाने वेगवेगळ्या पोज देत काढून घेतलेले हे फोटो चाहत्यांना पसंत पडले असून त्याला हजारोंच्या संख्येनं लाईक्स आहेत.

 

8/10

पूजाचे हे फोटो पाहून कोणी तिला 'सर्दी होईल' अशी मजेदार कमेंट केली आहे तर काहींनी तिला 'मराठीमधील प्रियंका चोप्रा' म्हटलं आहे. एका कमेंटला तर पूजानेच रिप्लाय दिलाय. तुम्हीच पाहा तिचा रिप्लाय...

 

9/10

पूजाचे हे फोटो सध्या चांगलेच चर्चेत असून अनेकांनी तर या पोस्टच्या कमेंटमध्ये पूजासाठी कविताही लिहिल्या आहेत.

 

10/10

पूजाचे हे सर्व पावसात भिजतानाचे फोटो श्रुती बागवेने काढल्याचं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 





Read More