मराठी अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर तिच्या नवीन लुकमुळे सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आली आहे.
'लाखात एक आमचा दादा' फेम मराठी अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर तिच्या मराठमोळ्या लुकमुळे नेहमी चर्चेत असते.
अभिनेत्रीने काही दिवसांमध्येच 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. याच मालिकेतून तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे.
अशातच अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकरने तिचे नवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
अभिनेत्रीने पोपटी रंगाची पैठणी साडी परिधान केली आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या लुकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, कानात झुमके आणि केसांमध्ये गुलाबाचे फुल आणि हलकासा मेकअप करून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने हे फोटो शेअर करताना या फोटोंना 'साज' असं कॅप्शन दिलं आहे. चाहते तिच्या या फोटोंवर कमेंट्स करत आहेत.
अभिनेत्रीने याआधी स्टार प्रवाहच्या 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत 'राजमा' ची भूमिका साकारली आहे. अभिनयासोबतच ती सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते.