मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रीने नुकतेच समुद्रकिनारी बिकिनीमध्ये फोटोशूट केलं असून तिने फोटो शेअर केलेत.
मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री आहेत ज्या बोल्ड आणि हॉट लुकमुळे नेहमी सोशल मीडियावर चर्चेत आणि ट्रोल होत असतात.
अशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री जी हॉट लुक आणि सौंदर्यामुळे नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या ती बिकिनी लुकमुळे प्रचंड चर्चेत आली आहे.
अभिनेत्री पहिल्यांदाच समुद्रकिनारी बिकिनीमध्ये फोटोशूट केलं असून तिने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यामुळे तिला ट्रोल देखील केलं जात आहे.
या प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव रुचिरा जाधव आहे. अभिनेत्रीने समुद्रकिनारी लाल रंगाच्या बिकिनीमध्ये जबरदस्त पोज दिल्या आहेत.
या बिकिनी लुकमध्ये रुचिरा जाधव खूपच हॉट दिसत असून तिचा हा लूक चाहत्यांना खूप आकर्षित करत आहे.तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
तर काही चाहत्यांनी तिला मराठी संस्कृतीची आठवण देखील करून देली आहे. ज्यामध्ये एका चाहत्याने तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अशी कमेंट केली आहे.
तर काही चाहत्यांनी सुंदर, हॉट, जबरदस्त आणि अप्रतिम लूक अशा कमेंट केल्या आहेत. तिचे बिकिनीमधील फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री रुचिरा जाधवने 'तुझ्यावाचून करमेना' या मालिकेतून पदार्पण केलं आहे. त्यासोबत तिने 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत देखील काम केलं आहे.
याच मालिकेतून रुचिरा जाधवला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने 'बिग बॉस मराठी 4' या शोमध्ये तिने सहभाग घेतला होता. तिचे इन्स्टाग्रामवर लाखो चाहते आहेत.