PHOTOS

बॉलिवूड कलाकारांना टक्कर देत IMDb टॉप 10 मध्ये सई ताम्हणकरची एन्ट्री!

बॉलिवूड आणि साऊथच्या बड्या कलाकारांना मागे टाकत IMDb च्या टॉप 10 लिस्टमध्ये मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरची एन्ट्री! 

Advertisement
1/7

मनोरंजन विश्वात सगळ्यात महत्वपूर्ण मनाला जाणाऱ्या IMDb ची या आठवड्याची आवडत्या कलाकारांची लिस्ट नुकतीच सोशल मीडियावर जाहीर झाली आहे. 

2/7

यामध्ये IMDb च्या टॉप 10 लिस्टमध्ये मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर अव्वल ठरली आहे. बॉलिवूडच्या मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये सई ताम्हणकरने वारंवार दिसत असताना आता IMDb च्या टॉप 10 लिस्टमध्ये तिने बॉलिवूड कलाकारांसोबत अव्वल स्थान निर्माण केलं आहे. 

3/7

बॉलिवूडमध्ये तिच्या कामाच्या चर्चा तर नेहमीच होत असतात. पण IMDb पॉप्युलर इंडियन सेलिब्रिटीच्या टॉप 10 लिस्टमध्ये सई 10 व्या क्रमांकावर आहे.

4/7

बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांना मागे टाकत सई ताम्हणकरने IMDb च्या टॉप 10 लिस्टमध्ये प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री ठरली आहे. 

 

5/7

सई ताम्हणकरच्या कामाचं सातत्य आणि बॉलिवूडमध्ये तिच्या वैविध्यपूर्ण कामाच्या चर्चा कायम बघायला मिळतात. येणाऱ्या काळात सई ताम्हणकर बॉलिवूडमध्ये बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स करणार आहे. 

6/7

त्यासोबतच सई ताम्हणकर क्राईम बीट, डब्बा कार्टेल, ग्राउंड झीरो, मटका किंग सारख्या मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

7/7

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री तिच्या हटके लुकमुळे खूप चर्चेत असते. नेहमी चाहत्यांसाठी ती फोटो शेअर करत असते. तिचे लाखो चाहते आहेत. 





Read More