फॅशन क्वीन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सई ताम्हणकरचा नवीन लूक चर्चेत आला आहे.
मराठी सिनेसृष्टीतील मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच तिच्या हटके स्टाईल आणि बोल्ड लुकने सोशल मीडियावर चर्चेत असते.
सई ताम्हणकरच्या प्रत्येक लुकची चाहत्यांमध्ये चर्चा सुरु असते. अशातच आता सईने तिचे नवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अभिनेत्री नेहमी वेगवेगळे फॅशन ट्रेंड्स फॉलो करत असते. हटके फॅशन, हॉट आणि बोल्ड लुकने ती चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
सईने नुकतेच काळ्या रंगाच्या गाऊनमधील फोटो शेअर केलेत. ज्यामध्ये ती खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे.
या फोटोमध्ये तिने कपाळावर टिकली आणि केसात फुलं लावली असून तिने हलकासा मेकअप केला आहे.
त्यासोबतच तिच्या हातामध्ये कडा आणि दुसऱ्या हातात सिल्वर रंगाच्या सुंदर बांगड्या आहेत. ज्या सध्या खूप चर्चेत आहेत.
सई ताम्हणकरचा हा लूक चाहत्यांना खूपच आकर्षित करत आहे. तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.