PHOTOS

'काही वेळेस गोष्टी जुळून येत नाही, मात्र त्यामुळे...'; घटस्फोटासंदर्भात सई ताम्हणकर स्पष्टच बोलली

Actress Sai Tamhankar On Divorce: बोल्ड आणि ब्युटीफूल असण्याबरोबरच मराठीमधील आघाडीची अभिनेत्री अशी ओळख मिळवलेल्या साईने घटस्फोटासंदर्भात नेमकं काय म्हटलं आहे जाणून घेऊयात...

Advertisement
1/9

सध्या मनोरंजनसृष्टीमध्ये घटस्फोटांसंदर्भातील बातम्या समोर येत असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरने घटस्फोटासंदर्भात आपलं मत अगदी स्पष्टपणे मांडलं आहे. ती काय म्हणालीय पाहूयात...

2/9

प्रसिद्ध क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि युट्यूबर धनश्री वर्मा दोघेही त्यांच्या घटस्फोटाच्या पोटगीच्या रक्कमेमुळे चर्चेत आहेत. खरं तर मागील काही काळात बॉलिवूडमधील अनेक जोडप्यांच्या घटस्फोटासंदर्भातील बातम्या समोर आल्या आहेत.

 

3/9

यामध्ये अगदी गोविंदा पत्नीपासून घटस्फोट घेणार यासंदर्भातील चर्चेपासून ते प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमाननेही विभक्त होण्याची घोषणा केलेल्या मनोरंजनसृष्टीला नजर लागल्याची चर्चा आहे. असं असतानाच मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने घटस्फोटाबद्दल आपलं रोखठोक मत व्यक्त केलं आहे.

 

4/9

घटस्फोटाबद्दल सई नेमकं काय म्हणाली? - सई ताम्हणकरने नुकतीच 'बॉलिवूड बबल'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये साईला घटस्फोटासंदर्भात तिची मतं विचारण्यात आली. सईला घटस्फोटासंदर्भात विचारण्यात आलं असता तिने घटस्फोट हे बदलेल्या समाज मनाचा आसरा दाखवात अशा पद्धतीचं मत नोंदवलं आहे. घटस्फोटांकडे पाहिल्यास आपला समाज मागील काही वर्षांमध्ये कशाप्रकारे विकसित झाला आहे हे दिसून येतं, असं सईने म्हटलं आहे. 

5/9

सईने घटस्फोटांसंदर्भात बोलताना अशाप्रकारे मोकळ्या मनाने सारं काही स्वीकारणारं जग अधिक चांगलं असल्याचं मत व्यक्त केलं आहे. आयुष्यातील अनुभव, आव्हानात्मक प्रसंग आहेत तसे स्वीकारल्याने अधिक शिकायला मिळतं असं सईने म्हटलं आहे. 

 

6/9

तसेच सईने काही वेळेस गोष्टी जुळून येत नाही. मात्र त्यामुळे काही बिघडत नाही. आपल्या वैयक्तिक विकासामध्ये हे असे अनुभव प्रगल्भ व्हायला मदत करतात, अशा आशयाचं विधान घटस्फोटासंदर्भात बोलताना केलं.  

7/9

सईने सांगितलेला तिच्या घटस्फोटाच्या वेळेचा अनुभव - अनेकांना ठाऊक नसेल पण सईनेही 2015 साली अमेय गोसावीपासून घटस्फोट घेतला आहे. 2013 मध्ये सई आणि अमेयचं लग्न झालं होतं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टीकला नाही. सई आणि अमेय दोन वर्षांमध्येच एकमेकांपासून विभक्त झाले. 

 

8/9

मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये सईने घटस्फोट घ्यायला गेल्यानंतर कोर्टातील अनुभव सांगितला होता. तिथे अगदी मोठ्याने तुमचं नाव पुकारतात. सई ताम्हणकर-गोसावी असं नाव पुकारलं. तिथे कागदोपत्री तेच नाव नोंदवलं गेलं. तिथे थोडं रडणं, एकेमेकांना सल्ले देणं असं सारं काही झालं होतं. मात्र त्यानंतर अनेक जवळच्या मित्रमैत्रिणी आम्हाला फोन करुन भेटायला आले होते, असं सई म्हणाली.

 

9/9

माझ्या आयुष्यात फार लवकर एक फारच वाईट नातं येऊन गेलं. त्यामधून मी बरंच काही शिकले आहे, असं सईने घटस्फोटासंदर्भातील अनुभव सांगताना मुलाखतीत म्हटलं होतं. सई सध्या मुंबईत वास्तव्यास असून मागील दहा वर्षांमध्ये तिने मराठीबरोबर हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या कामाचा ठसा उमटवल्याचं पाहायला मिळालं आहे.





Read More