PHOTOS

23 व्या वर्षी अभिनेत्री, 30 व्या वर्षी बनली सुपरस्टार कुटुंबाची सून, 34 व्या घेतला घटस्फोट, तुम्ही ओळखलं का?

चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी सर्वात कमी वयामध्ये इंडस्ट्रीवर राज्य केलं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर

Advertisement
1/7

दक्षिणेतील अनेक अभिनेत्री सध्या खूपच चर्चेत आहेत. अशातच आता दक्षिणेतील आघाडीची अभिनेत्री समांथा रुथ प्रभू तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. 

2/7

तिचा जन्म चेन्नईमध्ये झाला आहे. तिचे वडील जोसेफ प्रभु हे तेलुगु आणि आई निनेत्ति प्रभु मलयाली आहे. समांथा ही सर्वात लहान असून तिला दोन भाऊ आहेत. जोनाथन आणि डेविड.

 

3/7

 अभिनेत्रीने 2010 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती तिच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यामुळे देखील खूप चर्चेत असते. 

4/7

2013 मध्ये समांथाचे नाव सिद्धार्थसोबत जोडले जात होते. दोघांच्या अफेयरच्या खूप चर्चा रंगल्या होत्या. मात्र, हे नाते फार दिवस टिकले नाही. 2015 मध्ये दोघांचा ब्रेकअप झाला. 

5/7

यानंतर समांथाच्या आयुष्यात नागा चैतन्य आला. दोघांची भेट 'ये माया चेसावे' चित्रपटाच्या सेटवर झाली. 2016 मध्ये नागा चैतन्यने तिला प्रपोज केलं. त्यानंतर दोघांनी 2017 मध्ये लग्न केलं. 

6/7

लग्नाच्या वेळी समांथाचे वय 30 होते. पण हे देखील नाते टिकले नाही. 2021 मध्ये दोघांनी तलाक घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा ती सिंगल आयुष्य जगत आहे. 

7/7

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी लग्न केलं आहे. त्यानंतर समांथाचे नाव दिग्दर्शक राज निदिमोरु सोबत जोडले गेले होते. दोघे एकत्र देखील दिसले. 





Read More