PHOTOS

'इतकं सुंदर की नजर लागायची भीती', शिवालीचं निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या शिवाली परबने निसर्गाच्या सानिध्यातील खास फोटो शेअर केले आहेत. 

Advertisement
1/8

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम मराठी अभिनेत्री शिवाली परब नेहमी तिच्या अभिनयामुळे आणि तिच्या हटके लुकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. 

2/8

नुकतेच अभिनेत्रीने हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात आणि हिरव्या रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केलं आहे. 

3/8

तिचे हिरव्या साडीमधील फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. निसर्गरम्य वातावरणामध्ये शिवालीने एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत. 

4/8

मराठमोळं सौंदर्य त्यात हिरवी साडी, केसांमध्ये फुलं आणि हलकासा मेकअप करून अभिनेत्रीने हा लूक पूर्ण केला आहे. या लुकमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुललं आहे. 

5/8

अभिनेत्रीने दिलेल्या हटके पोज पाहून तिचे निसर्ग प्रेम दिसून आलं आहे. या साडीमध्ये शिवाली परब खूपच सुंदर आणि मनमोहक दिसत आहे. 

6/8

या फोटोंना तिने हं कवळ्या पाना ह्या, सावल्या उन्हात ह्या, पवळ्या मनात ह्या भरलं...तुझ गान मनामंदी घुमतय वाऱ्यामंदी असं कॅप्शन दिलं आहे. 

7/8

अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ज्यामध्ये एका चाहत्याने हिरवं हिरवं फुलपाखरू असं म्हटलं आहे.

8/8

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून शिवाली परबला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. याच कार्यक्रमातून ती घराघरात पोहोचली. 





Read More