'लागिरं झालं जी' फेम मराठी अभिनेत्री शिवानी बावकर तिच्या नवीन लुकमुळे चर्चेत आली आहे.
मराठी अभिनेत्री शिवानी बावकरला 'लागिरं झालं जी' आणि 'साधी माणसं' या मालिकेतून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे.
शिवानी बावकर सध्या 'साधी माणसं' या मालिकेत 'मीरा'ची भूमिका साकारत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळत आहे.
नुकतेच शिवानी बावकरने तिचे पांढऱ्या गाऊनमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यासाठी हा लूक केला होता.
या पांढऱ्या गाऊनमध्ये शिवानी बावकर खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
चाहत्यांनी तिच्या या लूकवर अप्सरा म्हणू की परी अशा कमेंट्स केल्या आहेत. सध्या तिचा हा लूक खूपच चर्चेत आला आहे.
शिवानी बावकर ही नेहमी तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. अभिनयासोबतच शिवानी बावकर ही तिच्या सौंदर्याने देखील चर्चेत असते.