्रीने 6 वर्षांमध्ये एकही फ्लॉप चित्रपट दिला नाही. आता तिच्या सौंदर्याची होतेय सोशल मीडियावर चर्चा. क...
आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिचे वडील देखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार होते.
या अभिनेत्रीने तिची बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलीय. गेल्या 6 वर्षांमध्ये या अभिनेत्रीने एकही फ्लॉप चित्रपट दिला नाहीये.
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या सौंदर्यामुळे खूपच चर्चेत असते. अनेक अभिनेत्यांसोबत तिने काम केलं आहे. त्यासोबतच तिचे सोशल मीडियावर देखील लाखो चाहते आहेत.
श्रद्धा कपूरने गेल्या काही वर्षांमध्ये लागोपाठ हिट चित्रपट दिले आहेत. तिचा अभिनय चाहत्यांना खूप आवडतो. 2010 मध्ये तिने 'तीन पत्ती नामक' या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली.
दरम्यान, 2024 मध्ये श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.
श्रद्धा कपूर ही शक्ति कपूर यांची मुलगी आहे. अभिनेत्री आज कोट्यावधींची मालकीन आहे. रिपोर्टनुसार, श्रद्धा कपूरची एकूण नेटवर्थ 130 कोटी रुपये इतकी आहे.
श्रद्धा कपूर ही सध्या आगामी प्रोजेक्टवर काम करत आहे. रिपोर्टनुसार, अभिनेत्री लवकरच एका नवीन चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे.