Smriti Vishwas Narang Death: बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी हिंदी आणि बंगाली सिनेसृष्टीत सौंदर्य आणि अभिनयाने अधिराज्य गाजवणारी ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास नारंग यांचं नाशिकमध्ये निधन झालं.
नाशिक रोड परिसरातील बिटको कॉलेजच्या जवळील चव्हाण मळात त्यांनी वयाच्या 100 वर्षी अखेरचा श्वास घेतला. चार महिन्यांपूर्वीच त्यांनी 100 वा वाढदिवस साजरा केला होता.
त्यांचा जन्म बांगलादेशातील ढाकामधील भरोसापूरमध्ये झाला. वडील नरेंद्र कुमार आणि आई ज्योतीमोंई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी बंगाली चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांच्या 'संध्या' मध्ये काम केलं.
गुरुदत्त, देवानंद, किशोर कुमार, अशोक कुमार, भगवान दादा, राज कपूर आणि बलराज सहानी यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केलं.
तर नर्गिस, नतून, कामिनी, कौशल, शशिकला, श्माया, निरुपमा या अभिनेत्रींसही त्यांनी स्क्रीन शेअर केली आहे.
त्यांना दादादासोबत फाळके गोल्डन इरा हा पुरस्कारही प्रदान करण्यात आलाय. स्मृती या कोट्यवधींच्या मालकिण तर होत्याच तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, राहण्यासाठी त्यांनी आतापर्यंत 28 जागा बदलल्यात.
नातेवाईकांनी त्यांची संपत्ती हडपल्यानंतर त्यांनी बहिणीकडे नाशिकमध्ये शेवटचे क्षण व्यतित केले. नाशिकच्या घरात त्यांचे सुवर्णकाळ दाखवणारे असंख्य फोटो आणि अर्वाडचे संग्रह पाहिला मिळतात.
त्यांच्या सौंदर्याच्या जादूतून सदाबहार देवानंदही वाचले नव्हते. मीडिया रिपोर्टनुसार देवानंद यांनी स्मृती यांना लग्नाची मागणी घातली होती. पण त्यांनी ती नाकारली होती. त्यांच्या पश्चात दोन मुलं आहेत.