PHOTOS

जुलै आणि मुंबई! मरीन ड्राइव्ह येथे पावसात सोनालीचं खास फोटोशूट, सौंदर्य आणि लूक चर्चेत

मुंबईच्या प्रेमात पडली सोनाली कुलकर्णी. पावसात मरीन ड्राइव्ह येथे हटके पोज देत लुटला पावसाचा आनंद.

Advertisement
1/8

मराठी अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनयासोबतच ती तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. 

 

2/8

नुकताच सोनाली कुलकर्णीने मुंबईतील पावसाचा आनंद घेत खास फोटोशूट केलं आहे. तिने तिचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

3/8

अभिनेत्रीने मरीन ड्राइव्ह येथे पावसात हे फोटोशूट करत पावसाचा मनसोक्त आनंद लुटला आहे. तिचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत. 

 

4/8

जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी अभिनेत्री समुद्रकिनारी गुलाबी रंगाच्या सिल्क साडीत हे खास फोटोशूट केलं आहे. यावेळी तिने मोकळे केस आणि कानात झुमके घातले होते. 

5/8

तिच्या पोज आणि सौंदर्य पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत. यासोबतच तिने गेट ऑफ इंडिया परिसरात देखील सुंदर फोटो काढले आहेत. 

6/8

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर करताना जुलै...आणि मुंबई असं कॅप्शन दिलं आहे. म्हणजेच सोनाली मुंबईच्या प्रेमात पडली आहे. 

7/8

या फोटोत ती खूपच सुंदर दिसत असून चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. 

 

8/8

एका चाहत्याने आज सुंदर आणि सौंदर्य एकत्र आलंय असं म्हटलं आहे. तर काही अभिनेत्रींनी देखील तिच्या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत. 

 





Read More