बॉलिवूडमधील या अभिनेत्रीने 4 वर्षाच्या करिअरमध्ये तीन केले. त्यामधील 2 चित्रपटांनी जगभारत 3000 कोटींची कमाई केली.
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकारांनी काम केलं आहे. काही कलाकारांनी इंडस्ट्रीमध्ये जास्त दिवस काम केले तर काहींनी कमी कालावधीमध्ये इंडस्ट्री सोडली.
अशीच एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. जिचे नाव जायरा वसीम आहे. ती सध्या तिचा 24 वा वाढदिवस साजरा करत आहे.
जायरा वसीमने वयाच्या 16 व्या वर्षी करिअरची सुरुवात केली आहे. तिच्या पहिल्या चित्रपटाचे नाव आहे 'दंगल'. हा चित्रपटात सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
'दंगल' चित्रपटाने जगभरात 2024 कोटी रुपयांची कमाई केली होती. यासोबत 'सीक्रेट सुपरस्टार' चित्रपटाने देखील चांगली कमाई केली होती.
भारतामध्ये हा चित्रपट इतका नाही चालला पण चीनमध्ये या चित्रपटाने चांगली कमाई केली. 'सीक्रेट सुपरस्टार' चित्रपटाने एकूण 965 कोटींची कमाई केली.
जायरा वसीमने 16 व्या वर्षी 'दंगल' हा चित्रपट केला होता. तर 2019 मध्ये 'द स्काई इज़ पिंक' या चित्रपटात काम केल्यानंतर अभिनेत्री अभिनयापासून दूर झाली.
इंडस्ट्रीपासून दूर जाण्याचा तिचा हा निर्णय चाहत्यांना धक्का देणारा होता. तिने 4 वर्षांच्या करिअरमध्ये 3 चित्रपट केले. यामधील दोन चित्रपटांनी 3000 कोटींची कमाई केली.