PHOTOS

लिंबू पाण्यात चिमूटभर टाका 'ही' पावडर, आरोग्यावर दिसतील 7 चमत्कारिक फायदे!

विशिष्ट पदार्थ खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. हे पदार्थ शरीराचे डिटॉक्स करतात आणि टॉक्सिन्स बाहेर काढतात. लिंबू आणि ही पावडर पा...

Advertisement
1/8
लिंबू पाण्याचे फायदे:
लिंबू पाण्याचे फायदे:

लिंबू पाणी हे बनवण्यास सोपे आहे. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून प्यावा. यामुळे पचनशक्तीला चालना मिळते आणि शरीराला लागणारे विविध पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे मिळतात. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन C आणि पोटॅशियम शरीरातील प्रदूषक पदार्थांपासून मुक्त होण्यास मदत करतात.

2/8

लिंबू पाण्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच लिंबू पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि गॅस, अपचन, आम्लतेच्या समस्यांपासून आराम मिळतो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम यकृत आणि किडनीचं असतं आणि लिंबू पाणी यकृताच्या कार्याला चालना देतं.

3/8
दालचिनीचे फायदे:
दालचिनीचे फायदे:

दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. दालचिनीचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी, पचनासाठी आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. यामध्ये असलेले फायबर्स, लोह, कॅल्शियम आणि मॅंगनीज शरीरास उपयुक्त ठरता

4/8

दालचिनीचे पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते आणि हृदयविकारांचा धोका कमी होतो. दालचिनीमध्ये असलेल्या अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मामुळे सांधेदुखीपासून आराम मिळवता येतो, तसेच शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते. अशाच प्रकारे दालचिनीचे सेवन केल्याने पचनसंस्था सुरळीत राहते आणि अन्न सहज पचते.

5/8
लिंबू आणि दालचिनी एकत्र का फायदेशीर आहे?
लिंबू आणि दालचिनी एकत्र का फायदेशीर आहे?

कोमट पाण्यात लिंबू आणि दालचिनी एकत्र मिसळून प्यायल्याने दोन्ही घटकांचे फायदे आपल्याला मिळतात. लिंबू पाण्याने शरीराच्या पचन क्रियेवर चांगला प्रभाव पडतो आणि दालचिनीचे अँटीऑक्सिडंट गुण शरीराला अधिक प्रभावीपणे डिटॉक्स करायला मदत करतात. या मिश्रणामुळे शरीराचे मेटाबॉलिझम सुधारते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

6/8

तसचं हे मिश्रण शरीरात ऊर्जा पातळी वाढवते आणि दिवसभर ताजेतवाने ठेवते. लिंबू आणि दालचिनी शरीराच्या इन्फ्लेमेटरी प्रतिक्रिया कमी करतात, त्यामुळे त्वचेवर होणारे पुरळ, मुरुम आणि इतर प्रकारची सूज कमी होण्यास मदत होते.

 

7/8
पचनासाठी आणि शरीरासाठी फायदेशीर उपाय:
पचनासाठी आणि शरीरासाठी फायदेशीर उपाय:

दररोज सकाळी लिंबू आणि दालचिनीचे पाणी प्यायल्याने पचन चांगले होते, शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात, वजन कमी होण्यास मदत होते आणि त्वचेवर चमक येते. तसेच या ड्रिंकने शरीरातील हॉर्मोन्स आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

8/8

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)





Read More