PHOTOS

Malmas किंवा Adhik Maas 'या' 5 राशींसाठी भाग्यवान, तुमची रास यात आहे का?

Malmas 2023 : अधिकमास आणि मलमासला सुरुवात झाली आहे. हा अधिकचा महिना 5 राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Advertisement
1/7

18 जुलैपासून सुरु झालेला मलमास हा 16 ऑगस्टपर्यंत असणार आहे. यंदा श्रावण अधिक मासाचा दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. 

2/7

 पंचांगानुसार या एक महिन्यात लक्ष्मी नारायण योगासोबत अनेक शुभ योग जुळून आले आहेत. त्यामुळे 5 राशींच्या नशिबात अमाप संपत्तीचा लाभ जुळून आला आहे. 

 

3/7
मेष (Aries)
 मेष (Aries)

या राशीसाठी या महिन्यात गूड न्यूज मिळणार आहे. नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढणार आहे. नवीन व्यवसाय करण्यासाठीही हा उत्तम काळ आहे. कुटुंबातील वातावरण आनंद असणार आहे. घरामध्ये धार्मिक कार्य घडणार आहे. 

4/7
वृषभ (Taurus)
वृषभ (Taurus)

अधिकमास वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभदायी ठरणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होणार आहे. अचानक धनलाभाचे योग आहेत. अविवाहित तरुणांचे लग्न ठरतील. 

 

5/7
कन्या (Virgo)
कन्या (Virgo)

कन्या राशीसाठी हा महिना आनंदी आनंद असणार आहे. लोकांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि उत्साह दिसून येणार आहे. तुमच्या करिअरमध्ये फायदा मिळणार आहे. ऑफिसमध्ये मोठी जबाबदारी मिळणार आहे. परदेशात जाण्याचे योग आहेत. 

6/7
तूळ (Libra)
तूळ (Libra)

सूर्य आणि बुध योग तूळ राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. व्यवसायात प्रगती होणार आहे. समाजात सन्मान वाढणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत गवसणार आहे. तुमची सर्व स्वप्नं पूर्ण होतील. 

7/7
कुंभ (Aquarius)
 कुंभ (Aquarius)

कुंभ राशीसाठी अधिक महिना अतिशय लाभदायी ठरणार आहे. खास करुन जे लोक पाटर्नशीपमध्ये बिझनेस करणाऱ्यांना धनलाभाचे योग आहेत. मोठं काम तुमच्या हातून घडणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. कठीण कामंही सोप्पी होणार आहेत. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) 





Read More