Adipurush OTT Release News In Marathi: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू रंगत होती. शेवटी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान, सनी सिंग, देवदत्त नागे अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटी वर येणार आहे.
बहुचर्चित आदिपुरुष हा सिनेमा अखेर आज म्हणजेच 16 जून रोजी देशभर प्रदर्शित झाला आहे. सिनेमा रिलीजने आधीच कोटींची कमाई केली आहे.
आदिपुरुषचा फर्स्ट डे फर्स्ट शो देशा झाला. पहिल्याच दिवशी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. चित्रपटगृहांमध्ये सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळतोय.
तसेच, सिनेमा निर्मात्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार भगवान हनुमानासाठी प्रत्येक चित्रपटगृहातील एक जागा रिक्त ठेवण्यात आली आहे.
याचदरम्यान चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर 50 दिवसांनी आदिपुरुष सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, आदिपुरुषच्या निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी करारही केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘आदिपुरुष’ सिनेमा अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. यासाठी 250 कोटींचा करार झाल्याची माहिती आहे.
या चित्रपटाने म्युझिक, सॅटेलाइट आणि इतर डिजिटल राइट्सच्या विक्रीद्वारे 432 कोटींची कमाई केली आहे.