PHOTOS

मध्यरात्री आपण गाढ झोपेत असताना आदित्य L-1 घेणार मोठी झेप, अंतराळात काय होणार? जाणून घ्या

  ISRO ने सोलर मिशन आदित्य L-1 कडून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात पाठवलेल्या या मोहिमेचा वैज्ञानिक प्रयोग सुरू झाला आहे.

Advertisement
1/9
आदित्य L-1 घेणार मोठी झेप, मध्यरात्री आपण गाढ झोपेत असताना अंतराळात काय होणार?
आदित्य L-1 घेणार मोठी झेप, मध्यरात्री आपण गाढ झोपेत असताना अंतराळात काय होणार?

Aditya L1 Mission Update: गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीच भारताची स्पेस एजन्सी ISRO ने सोलर मिशन आदित्य L-1 च्या मोठ्या कामगिरीची माहिती दिली आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात पाठवलेल्या या मोहिमेचा वैज्ञानिक प्रयोग सुरू झाला आहे.

2/9
पृथ्वीपासून 50 हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतर
पृथ्वीपासून 50 हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतर

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी, देशातील पहिल्या अंतराळ-आधारित सौर प्रयोगशाळेतील रिमोट सेन्सिंग पेलोडने पृथ्वीपासून 50 हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार केले. तसेच सुपरथर्मल आयन उच्च ऊर्जा कण आणि इलेक्ट्रॉन मोजणे सुरू केले आहे. य़ाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

3/9
सुप्रा थर्मल आणि एनर्जेटिक पार्टिकल स्पेक्ट्रोमीटर
सुप्रा थर्मल आणि एनर्जेटिक पार्टिकल स्पेक्ट्रोमीटर

इस्रोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टद्वारे माहिती दिली आहे. सुप्रा थर्मल आणि एनर्जेटिक पार्टिकल स्पेक्ट्रोमीटर नावाच्या उपकरणाचे सेन्सर आहेत. ज्यांनी आता वैज्ञानिक डेटा गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या डेटाच्या मदतीने शास्त्रज्ञ पृथ्वीभोवतीच्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करू शकणार आहेत. 

4/9
पुढील महत्त्वाचा टप्पा
पुढील महत्त्वाचा टप्पा

दुसरीकडे, आदित्य एल-1 पुढील महत्त्वाचा टप्पा सुरू करण्यासाठी सज्ज आहे. अंतराळयान सोमवारी मध्यरात्री ट्रान्स लॅग्रॅन्जियन पॉइंट 1 इन्सर्शन (TL1I) मधून जाईल, असे इस्रोनो सांगितले आहे.

5/9
19 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजता
19 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजता

Trans Lagrangian Point 1 insertion हे पृथ्वीच्या कक्षेचे प्रक्षेपण आहे. जे 19 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजता होईल. यासह, पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील लॅग्रेंज पॉइंट 1 (L1) पर्यंत सुमारे 110 दिवसांचा प्रवास सुरू होईल. सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर 15 लाख किलोमीटर आहे.

6/9
आदित्य L1 चे उद्दीष्ट्य
आदित्य L1 चे उद्दीष्ट्य

सूर्याचे फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि कोरोनाचा अभ्यास करणे हे आदित्य L1 चे उद्दीष्ट्य आहे. याशिवाय अंतराळातील हवामानाची गतिशीलता आणि कणांवरील क्षेत्रांचा प्रसार यांचाही अभ्यास केला जाणार आहे.

7/9
चौथी प्रक्रिया
चौथी प्रक्रिया

पृथ्वीच्या कक्षा बदलाची पहिली, दुसरी आणि तिसरी आणि चौथी प्रक्रिया अनुक्रमे 3, 5 आणि 10 आणि 15 सप्टेंबर रोजी यशस्वीरित्या पार पडली.

8/9
संपूर्ण मिशन लाइफ L1 भोवती
संपूर्ण मिशन लाइफ L1 भोवती

आदित्य L-1 आपले संपूर्ण मिशन लाइफ पृथ्वी आणि सूर्य यांना जोडणार्‍या रेषेच्या जवळपास लंब असलेल्या आकारच्या कक्षेतील एल 1 च्या चहुबाजूने परिक्रमा करण्यात घालवणार आहे.

9/9
2 सप्टेंबरला प्रक्षेपण
2 सप्टेंबरला प्रक्षेपण

ISRO च्या PSLV-C57 ने 2 सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) च्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरून आदित्य-L1 चे प्रक्षेपण केले.





Read More