PHOTOS

काय चाललं काय? आफ्रिका खंड तुटणार, नवा महासागर जन्माला येणार

Africa Continent Rifting : अनेक अहवालांतून समोर आलेल्या माहितीनुसार जगातील दुसरा सर्वात मोठा खंड असणाऱ्या आफ्रिकेचे दोन तुकडे होत आहेत. 

Advertisement
1/7
खरं वाटत नाहीये?
खरं वाटत नाहीये?

खरं वाटत नाहीये? सृष्टीची ही चाल तुम्हालाही हादरवून सोडेल. कारण, आफ्रिकेचे तुकडे होण्यास सुरुवात केली आहे. कारण, तांबड्या समुद्रापासून मोजाम्बिकपर्यंत पूर्व आफ्रिकेकडे असणारी भेग आता आणखी रुंदावत चालली आहे. 

 

2/7
ही भेग 3500 मीटर इतकी लांब आहे
 ही भेग 3500 मीटर इतकी लांब आहे

सध्या ही भेग 3500 मीटर इतकी लांब असल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्य म्हणजे या घटनेसंदर्भातील भविष्यवाणी बरीच आधी करण्यात आली होती. पण, यावर अनेकांचा विश्वास बसत नाहीये. 

3/7
कॉन्टिनेंट रिफ्टींग
कॉन्टिनेंट रिफ्टींग

आफ्रिकेमध्ये घडत असलेल्या या घटनेला कॉन्टिनेंट रिफ्टींग असं म्हणतात. जिथं भूगर्भातील टेक्टॉनिक प्लेटचे दोन किंवा त्याहून अधित पदर मोकळे होण्यास सुरुवात होते. परिणामी भूपृष्ठावर दरी तयार होते. फक्त जमीनच नव्हे, तर समुद्राच्या तळाशीसुद्धा अशा घटना घडतात. 

4/7
आफ्रिका खंड तुटणार?
आफ्रिका खंड तुटणार?

पूर्व आफ्रिकेमध्ये असणारी ही भेग या खंडालाच दुभाजत आहे. इथं जेव्हा लिथोस्फियर हॉरिजॉन्टल एक्सपांडिग फोर्सखाली असतो तेव्हा ही भेग आणखी मोठी होत जाते. वैज्ञनिक भाषेक या घटनेका रिफ्टींग असं म्हणतात. या रिफ्टमुळंच आफ्रिका खंड तुटणार आहे. 

5/7
महासागर जन्माला येण्याच्या प्रक्रियेतील ही प्राथमिक घटना
महासागर जन्माला येण्याच्या प्रक्रियेतील ही प्राथमिक घटना

एक महासागर जन्माला येण्याच्या प्रक्रियेतील ही प्राथमिक घटना आहे. त्यामुळं आफ्रिकेतील ही भेग रुंदावणं सुरु राहिल्यास जगात एक नवा महासागर अस्तित्वात येईल. दक्षिण अटलांटिक महासागरात अनेक हजार वर्षांपूर्वी अशीच घटना घडल्याची माहिती आहे. 

 

6/7
ही भेग जसजशी पसरत जाईल ...
ही भेग जसजशी पसरत जाईल ...

आफ्रिकेतील ही भेग जसजशी पसरत जाईल तसतसं यामध्ये समुद्रातील पाण्याचा शिरकाव होईल आणि एक समुद्र जन्माला येईल. या प्रक्रियेतून सोमालियाची प्लेट पुढे ढकलली जाईल आणि सोमालिया- इथोपिया एकमेकांपासून वेगळे होतील आणि आफ्रिका खंडाचं क्षेत्रफळ कमी होईल. 

 

7/7
हे सर्व कधी घडणार?
हे सर्व कधी घडणार?

आता तुम्ही म्हणाल हे सर्व कधी घडणार? तर, शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांच्या मते या संपूर्ण प्रक्रियेसाठी 5 ते 10 कोटी वर्षांचा कालावधी लागू शकतो. आफ्रिकेसोबत असं काही घडल्यास युगांडा आणि झांबिया या देशांना स्वतंत्र समुद्रकिनारा लाभणार आहे. 

 





Read More