अजय देवगनच्या 'सिंघम अगेन'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. आता कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 3 चा ट्रेलर या दिवशी रिलीज होणार आहे.
दिवाळीला बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पहिला अजय देवगनचा 'सिंघम अगेन' आणि दुसरा कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3'
नुकताच अजय देवगनच्या 'सिंघम अगेन'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये अजय देवगनसोबत अक्षय कुमार, रणवीर सिंग, करीना कपूर आणि इतर कलाकार देखील आहेत.
'सिंघम अगेन'नंतर आता 'भूल भुलैया 3'च्या ट्रेलर रिलीज होणार आहे. ट्रेलर रिलीजची तारीख देखील जाहीर झाली आहे.
'भूल भुलैया 3'च्या ट्रेलरमध्ये हॉरर, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्स बघायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर हा 3 मिनिटांचा असल्याचे म्हटले जात आहे.
'भूल भुलैया 3' या चित्रपटात कार्तिकसोबत तृप्ती डिमरी, विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि राजपल यादव हे देखील असणार आहेत.
27 सप्टेंबरला या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. हा टीझर प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता.