Lunar Eclipse 2023 : सूर्यग्रहणानंतर आता शरद पौर्णिमेला या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण असणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असून हे दोन राशींसाठी घातक ठरणार आहे.
दसरा झाल्यानंतर शरद पौर्णिमेला 28 तारखेला चंद्रग्रहणाची वेळ पहाटे 1:05 ते 2:24 पर्यंत असणार आहे.
चंद्रग्रहण भारतासोबतच इतर देशांमध्येही सहज दिसणार आहे. चंद्रग्रहणाचा संपूर्ण जगावर नकारात्मक परिणाम घेऊन येणार आहे.
भारताव्यतिरिक्त अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, हिंद महासागर, पॅसिफिक महासागर आणि इतर ठिकाणीही चंद्रग्रहण दिसणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणचा सुतक कालावधी हा 9 तास आधी सुरु होणार आहे.
या चंद्रग्रहणाचा दोन राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. मिथुन आणि कन्या राशीला विशेष लाभ होणार आहे. तर 2 राशीच्या लोकांना खूप संकट घेऊन येणार आहे.
ग्रहण काळात चंद्र मेष राशीच्या चढत्या घरात असणार आहे. पूर्वेकडून राहु देखील मेष राशीच्या चढत्या घरात स्थित असेल. त्यामुळे मेष राशीच्या लोकांची मानसिक चिंता वाढणार आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. सुतक वेळात विशेष काळजी घ्या. या काळात वाद टाळा.
कर्क राशीचा स्वामी चंद्रदेव आणि पूजनीय देवतांचा देव महादेव आहे. त्यामुळे ग्रहणकाळात कर्क राशीच्या लोकांवर त्याचा व्यापक प्रभाव दिसून येणार आहे. अनावश्यक काळजी वाढणार आहे. मनात द्वेषाची भावना निर्माण होईल. कोणाशी वाद होणार आहे. गुंतवणूक आणि कोणतेही मोठे निर्णय टाळा. वाहन चालवताना काळजी घ्या. ग्रहणाच्या वेळी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)