सोनाली हाय ग्रेड आणि मेटास्टेसिस कॅन्सरचा सामना करत आहे. या दुर्धर आजारावर लवकरात लवकर मात करण्यासाठी सोनालीचे चाहते आणि बॉलिवूड सेलिब्रिटी प्रार्थना करत आहेत.
सोशल मीडियावर एका हळव्या पोस्टद्वारा सोनालीने तिच्या कॅन्सरबाबत माहिती दिली. त्यानंतर सोनालीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
अभिनेत्री आदिती राव हैदरीने देखील सोनालीची नणंद सृष्टी बेहलची भेट घेतली. सोनालीचा कॅन्सर मेटास्टेसिस स्वभावाचा आहे. म्हणजे हा कॅन्सर शरीराच्या इतर भागात झपाट्याने वाढण्याचा धोका आहे.
हुमा कुरेशीने सृष्टी बहलची भेट घेतली. सोनाली बेंद्रेने फिल्ममेकर गोल्डी बहलसोबत लग्न केले. सृष्टी ही गोल्डीची बहीण आहे.
सोनाली बेंंद्रे सध्या कॅन्सरच्या उपचारांसाठी न्यूयॉर्कमध्ये आहे. 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' या रिएलिटी शोच्या परिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या सोनालीची जागा आता हुमा कुरेशीने घेतली आहे. (फोटो साभार Yogen Shah)