PHOTOS

सुहाना अगस्त्य नंदाबरोबर रिलेशनमध्ये! सेटवर कोपऱ्यात दोघेही.., Kiss अन्.. नात्याबद्दल कुटुंब काय म्हणालं?

Agastya Nanda and Suhana Khan: अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हे रिलेशनशीपमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाल्याचं वृत्त आहे. खान आणि बच्चन कुटुंबियांना या नात्याची कल्पना आहे. या नात्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे पाहूयात...

Advertisement
1/17

शाहरुख खान आणि गौरी खान यांची लेक सुहानाने नुकताच जोया अख्तरच्या 'द आर्चीज' चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 

2/17

सुहानाचा अभिनय आणि बिनधास्त वावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. तसेच सुहानाची स्टाइल आणि क्यूट स्माइलही चर्चेचा विषय आहे.

3/17

सुहाना ही तिच्या प्रोफेश्नल कामाबरोबरच लव्हलाइफमुळे चर्चेत आहे. सुहाना आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा या दोघांच्या अफेरअरची चर्चा सध्या मनोरंजन सृष्टीमध्ये आहे. 

4/17

'द आर्चीज' स्टार सुहाना खान आणि अगस्त्य नंदा दोघेही रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघांच्या या नात्याची कल्पना बच्चन तसेच खान कुटुंबालाही असून त्यांनीही यासंदर्भात काय म्हटलंय याच्या बातम्याही चर्चेत आहेत.

5/17

नेटफ्लिक्सच्या 'द आर्चीज' चित्रपटामधून सुहाना आणि अगस्त्य या दोन्ही स्टार किड्सने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

6/17

'टाइम्स नाऊ'च्या एका वृत्तानुसार दोघेही रिलेशनमध्ये असून या रिलेशनबद्दल ते फार गांभीर्याने विचार करत आहेत. सेटवरच दोघांची भेट झाली आणि नंतर जवळीक वाढत गेली, असं सूत्रांनी म्हटलं आहे. 

7/17

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांची नजर एकमेकांवरुन दूर होत नव्हती. या दोघांच्या या कथित अफेरची चर्चा सेटवरुनच सुरु झाली.

8/17

सेटवर जवळपास सर्वांना सुहाना आणि अगस्त्य एकमेकांना पसंत करतात हे ठाऊक होतं. या दोघांबद्दलचे अनेक किस्से सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

9/17

सुहाना आणि अगस्त्य दोघेही सेटच्या एखाद्या कोपऱ्यात उभे राहून एकमेकांशी बराच वेळ बोलायचे.

10/17

सेटवरुन सुरु झालेल्या सुहाना आणि अगस्त्यच्या या मैत्रीचं रुपांतर नंतर डेटिंगमध्ये झालं. दोघेही डिनर टेड आणि फिरायला जाऊ लागले.

11/17

या नात्यावर खान आणि बच्चन कुटुंबाची काय प्रतिक्रिया आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर दोन्ही कुटुंब या नात्यावर समाधानी असल्याचं समजतं. दोघेही एकमेकांना एवढ्या गांभीर्याने जोडीदार म्हणून पाहतील अशी कुटुंबांना अपेक्षा नव्हती.

12/17

सुहाना आणि अगस्त्य या दोघांचं हे पहिलं प्रेम असल्याने त्यांच्यातील बॉण्डींग केवळ चित्रपटाच्या शुटींगपुरतं मर्यादीत राहिल असं कुटुंबाला वाटत होते.

13/17

मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही सुहाना आणि अगस्त्य संपर्कात आहेत आणि एकमेकांना डेट करत आहेत. याबद्दल कुटुंबाने समाधान व्यक्त केलं आहे.

14/17

अगस्त्यची आई म्हणजेच अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा-बच्चनने सुहानाबरोबरच्या लेकाच्या नात्याला होकार दिल्याचं समजतं.

15/17

अगस्त्य नाताळानिमित्त कपूर कुटुंबाच्या सेलिब्रेशनमध्ये सुहानाला घेऊन गेला होता.

16/17

तानिया श्रॉफच्या वाढदिवसाच्या दिवशी अगस्त्य सुहानाला गाडीमध्ये सोडायला गेला तेव्हा फ्लाइंग किस देताना दिसला होता.

17/17

23 नोव्हेंबर 2023 रोजी अगस्त्य नंदाचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये सुहाना अगस्त्य नंदाच्या बाजूला केक कटिंगासाठी उभी असल्याचं दिसून आलं होतं.





Read More