Marathi News: गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान क्रॅश झालं. हे विमान दिल्लीहून अहमदाबाद व्हाया लंडन असा प्रवास करणार...
एअर इंडियाचे विमान AI-171 हे विमान क्रॅश झालं आहे. प्राथमिक माहितीनुसार, विमानात 242 प्रवासी होते ज्यामध्ये 2 पायलट आणि 10 केबिन क्रू होते. हे एअर इंडियाच बोईंग 787-8 ड्रीमलाइनवर विमान होतं. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या या विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिकांचा समावेश आहे.
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे फ्लाइट नंबर AI-171 ने दुपारी 1.38 वाजता उड्डाण केलं. आणि दुपारी 1.40 वाजता हे विमान क्रॅश झालं. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान 24 मिनिटं उशीरा निघाले.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून निघालेलं हे विमान अहमदाबाद व्हाया लंडनला जात होतं. एअर इंडियाचं हे विमान AI 171 ने 5,7,9,10 आणि 11 जून रोजी अहमदाबाद ते लंडन प्रवास केला आहे. या फ्लाइटने 5,7 आणि 9 जून रोजी दुपारी 1.10 वाजता टेक ऑफ केलं तर 11 जून रोजी 11.40 रोजी लंडनकरिता उड्डाण भरली.
एअर इंडियाच्या फ्लाइट AI 171 विमानात 242 प्रवासी आहे. या विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिकांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद एअरपोर्टवरुन उड्डाण केल्यानतर अवघ्या 4 मिनिटांत हे विमान क्रॅश झालं. टेकऑफनंतर हे विमान रहिवाशी परिसरात कोसळलं.
मेघानी नगरमधील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला हे विमान कोसळलं आहे. अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसह झालेल्या केबिन अपघाताच्या घटनेने वैद्यकीय जगतालाही हादरवून टाकले, कारण ही दुर्घटना BJ वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीला धडकल्यानंतर घडली. अपघाताच्या वेळी इमारतीत अनेक कर्मचारी आणि काही विद्यार्थीही उपस्थित होते.अपघातानंतर समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेरील भिंती आणि खिडक्यांना मोठे नुकसान झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. इमारतीच्या संपूर्ण मजल्याचे नुकसान झाले आहे, ज्यामुळे सर्वत्र कचरा पसरला आहे. मदत आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आणि तातडीने कारवाई सुरू केली.
अहमदाबाद अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि पोलिस आयुक्तांशी चर्चा केली. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या पथके मदत आणि बचाव कार्य करत आहेत. तसेच अपघातानंतर मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत.
या घटनेनंतर अहमदाबादच्या आसपासच्या सर्व रुग्णालयांना सतर्क करण्यात आले आहे. आपत्कालीन सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. अपघातस्थळावरून प्रवाशांना रुग्णालयात नेण्यासाठी ५ मोठ्या रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. या अपघाताची माहिती देताना एअर इंडियाने म्हटले आहे की अहमदाबाद-लंडन गॅटविक फ्लाइट क्रमांक AI171 क्रॅश झाला आहे. आम्ही घटनेची माहिती गोळा करत आहोत.
तीन अग्निशमन दलाच्या तुकड्या घटनास्थळी उपस्थित आहेत. अपघातानंतर रस्ते बंद करण्यात आले आहेत. झाडाला धडकल्यानंतर विमान लगेचच कोसळले, त्यानंतर लगेचच मोठा स्फोट झाला आणि विमान आगीच्या ज्वाळांनी वेढले गेले. संपूर्ण विमान जळून खाक झाले आहे. दूरवर धुराचे लोट दिसत आहेत. परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.
गुजरातमधील अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासोबतच या अपघाताची माहिती देण्यासाठी १८०० ५६९१ ४४४ हा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. याशिवाय अहमदाबाद पोलिसांनी एक क्रमांक देखील जारी केला आहे.