PHOTOS

PHOTOS: तुम्ही सुद्धा या तरुणीच्या सौंदर्यावर भाळला असाल तर थांबा, कारण...

Spanish Model Aitana: फोटोत दिसणाऱ्या या तरुणीला पाहता क्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडेल. पण दिसतं तसं नसतं म्हणतात त्याप्रमाणे या चेहऱ्यामागील सत्य समजल्यानंतर तुमच्या पायाखालील जमीन सरकेल यात शंका नाही. फोटोत दिसणारी ही तरुणी साधीसुधी नसून फारच खास आहे. तिच्याचबद्दल जाणून घेऊयात या फोटोगॅलरीमधून...

Advertisement
1/13

'आयटाना' ही स्पेनमधील पहिली एआय म्हणजेच आर्टिफिशीएल इंटेलिजन्स मॉडेल आहे.

2/13

'आयटाना' ही दिसायला फारच सुंदर असून पाहता क्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडेल.

3/13

तिला पहिल्यावर विश्वास बसणार नाही पण 'आयटाना' ही प्रत्यक्षात अस्तित्वात नसून केवळ एक एआय मॉडेल आहे.

4/13

प्रसिद्ध डिझायनर रुबेन क्रुझने 'आयटाना'ची निर्मिती केली आहे.

5/13

आपल्या 'क्लूलेस' नावाच्या एजन्सीच्या माध्यमातून रुबेनने 'आयटाना'ची निर्मिती केली आहे.

6/13

"चांगलं आयुष्य जगण्याच्या उद्देशाने आम्ही 'आयटाना'ची निर्मिती केली आहे. आपल्याला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही, अशी यामागील संकल्पना आहे," असं रुबेन म्हणाला.

7/13

अनेक महिने 'क्लूलेस' कंपनी 'आयटाना'संदर्भातील प्रयोग करत होती. अखेर त्यांना बऱ्याच महिन्यानंतर एक सुंदर एआय मॉडेल बनवण्यात यश आलं.

8/13

'आयटाना' ही केवळ डिजीटल माध्यमामध्ये अस्तित्वात असली तर तिचं महिन्याची कमाई 3 ते 10 हजार युरो इतकी आहे.

9/13

भारतीय चलनानुसार 'आयटाना'ची सरासरी मासिक कमाई 2 लाख 73 हजार रुपये आहे. तिने एका महिन्यात सर्वाधिक 9 लाख 13 हजारांची कमाई केलेली.

10/13

'आयटाना' ही स्पेनमधील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स कंपनीची ओळख बनली आहे. या कंपनीचं नाव बिग असं आहे.

11/13

'ओन्लीफॅन'प्रमाणे असलेल्या 'फॅनेव्हू' या प्लॅटफॉर्मवरही 'आयटाना' प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या माध्यमांवर एआय मॉडेल कशी काम करु शकते याचा हा प्रयोग आहे. ती या माध्यमातून कमाई करते.

12/13

मागील काही महिन्यांमध्ये 'आयटाना'चे इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या 1 लाख 21 हजारांहून अधिक झाली आहे. इतर माध्यमांवरही तिला बरेच फॉलोअर्स आहेत.

13/13

'आयटाना'च्या सौंदर्यावर अनेक सेलिब्रिटीही भाळले असून एका अभिनेत्याने तिच्या अकाऊंटवर तिला पर्सनल मेसेज केल्याची माहितीही समोर आली आहे.





Read More