Air India Uniform dsigned by Manish Malhotra : काही मंडळी तिथं असणाऱ्या केबिन क्रूची विनम्रता आणि त्यांचा पेहराव, सौंदर्य पाहून भारावतात.
Air India Uniform dsigned by Manish Malhotra : अशा या विमानप्रवास पुरवणाऱ्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या एअर इंडियानं नुकताच एक मोठा बदल घडवून आणला आहे.
1932 मध्ये सुरु झालेल्या एअर इंडियानं मागील सहा दशकांनंतर अखेर वैमानिक (Pilots) आणि केबिन क्रूसाठी नवा ड्रेसकोड अर्थात सेवेत असतानाचा गणवेश नव्यानं जगासमोर आणला आहे.
विस्ताराशी हातमिळवणी होत असतानाच हा नवा ड्रेसकोड समोर आल्यामुळं सध्या चर्चेचा एकच विषय सर्वत्र पाहायला मिळतोय आणि तो म्हणजे, एअर इंडियाच्या केबिन क्रूचा बदललेला लूक.
एअर इंडियाच्या सुवर्ण इतिहासाची साथ घेत आणि उज्ज्वल भवितव्याची हमी देत हा नवा लूक कंपनीनं समोर आणला.
जवळपास 10 हजारहून अधिक ग्राऊंड स्टाफ, केबिन क्रू, सुरक्षा रक्षक यांच्यासाठी हा नवा ड्रेसकोड सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यानं डिझाईन केला आहे.
सोनेरी, लाल आणि गडद जांभळ्या रंगांच्या छटांची सुरेख रंगसंगती साधत साडीवजा लूक मनिषनं एअर इंडियासाठी काम करणाऱ्या या मंडळींसाठी डिझाईन केला.
2023 या वर्षाच्या अखेरपर्यंत हा नवा ड्रेसकोड वापरात येणार असल्याची अधिकृत माहिती कंपनीनंच एका पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.
दरम्यान, डिझायनर मनिष मल्होत्रा यानंही एअर इंडियासारख्या संस्थेचा ड्रेसकोड डिझाईन करणं ही आपल्यासाठीही एक अभिमानास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया दिली.