Sunny Deol Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेता सनी देओल त्याचा आगामी चित्रपट गदर 2 मुळे सतत चर्चेत असतो. तर ऐश्वर्या राय बच्चन ही कुठल्या ना कुठल्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. या दोघांचे एक चित्रपटातील बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
'गदर 2' मध्ये सनी देओलसोबत अभिनेत्री अमिषा पटेल दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग जवळपास पूर्ण झाली आहे. हा चित्रपट ऑगस्टमध्ये प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे, असं बोलतं जातं आहे. शूटिंगचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
नुकतेच सोशल मीडियावर सनी देओल आणि ऐश्वर्याचे काही फोटो जोरदार व्हायरल होत आहेत. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी आजपर्यंत चित्रपटाची स्क्रीन शेअर केलेली नाही. त्यातील एक नाव आहे सनी देओल आणि ऐश्वर्या राय...मग त्यांचे हे फोटो कुठले आहेत.
आम्ही तुम्हाला सांगतो, चित्रपटसृष्टीच्या सूत्रांनुसार 1997 मध्ये एक चित्रपट तयार होत होता. ज्यात अॅश आणि सनी एकत्र काम करत होते. पण हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही.
रिपोर्टनुसार हा चित्रपट त्या काळातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटासाठी तब्बल 4.5 कोटी खर्च करण्यात आले होते.
या चित्रपटासाठी एक गाणे शूट करण्यासाठी निर्मात्यांनी सुमारे 1.7 कोटी खर्च केले होते, अशी चर्चा आहे.
या चित्रपटामध्ये सनी आणि ऐश्वर्याने भरपूर बोल्ड सीन दिले होते. ज्यामुळे खूप वाद झाला होता.
सनी देओल आणि ऐश्वर्या राय यांच्या चित्रपटाचं नाव 'इंडियन' होतं. पदम कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते तर पहलाज निहलानी यांनी चित्रपटाची निर्मिती केली होती.
'इंडियन' हा त्या काळातील बिग बजेट चित्रपट होता. त्यावेळेस चित्रपटाचे बजेट खूप जास्त होते आणि त्यामुळे निर्मात्यांना चित्रपट थांबवावा लागला. त्यामुळे सनी आणि ऐश्वर्या चाहते कधीच पडद्यावर एकत्र पाहू शकले नाहीत.
'इंडियन' या चित्रपटात सनी दुहेरी भूमिकेत होता. लष्करी अधिकारी आणि दशतवादी अशा दोन भूमिका तो साकारत होता.
यानंतर सनीने 2000 मध्ये 'इंडियन' नावाचा सिनेमा बनवला होता. ज्यामध्ये त्याचासोबत शिल्पा शेट्टी दिसली होती. तो सुपरहिट झाला होता.
ऐश्वर्या राय ते श्रीदेवीसारख्या बड्या अभिनेत्रींनी सनी देओलसोबत काम करण्यास नकार दिला होता. याबद्दल खुद्द सनीने एका मुलाखत सांगितलं होतं.
सनी देओलच नाही तर सुनील शेट्टीसोबत पण ऐश्वर्याने एक चित्रपटासाठी काम केलं होतं. तोही आजपर्यंत रिलीज झाला नाही. हम पांची एक डाल के असं त्या चित्रपटाचं नाव होतं.