Team India ODI Captain After Rohit Sharma: सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा संघाचं नेतृत्व करतोय आणि टी-ट्वेंटीमध्ये सूर्यकुमार यादव संघाची जबाबदारी सांभाळत आहे. मात्र, रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा वनडेचा कॅप्टन कोण असेल? यावर अजित आगरकर यांनी स्पष्टत संकेत दिले आहेत.
शुभमन गिल सर्व फॉरमॅटमध्ये खेळतो आणि गेल्या वर्षभरात त्याने चांगला खेळ दाखवला आहे, असं अजित आगरकर म्हणाले आहेत.
शुभमन गिलने सूर्यकुमार यादव किंवा रोहित शर्मासारख्या वरिष्ठ खेळाडूंकडून शिकावं अशी आमची इच्छा आहे, असं आगरकर म्हणाले.
जर कॅप्टनला दुखापत झाल्यास किंवा फॉर्ममध्ये नसल्यास आम्हाला कॅप्टनसाठी शोधाशोध करावी लागणार नाही, असंही आगरकर म्हणाले.
अजित आगरकरांच्या वक्तव्यावरून चर्चेला उधाण आलंय. रोहित शर्मानंतर आता शुभमन गिल टीम इंडियाचा वनडे कॅप्टन असेल, असे संकेत आगरकरांनी दिले आहेत.
दरम्यान, शुभमन गिलला आगामी वनडे कॅप्टनच्या रुपात समोर आल्याने हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांना मोठा धक्का बसलाय.