Unique Coincidence On 22 July With Reference To Ajit Pawar Devendra Fadnavis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर त्याच्याबरोबरच अन्य 9 राष्ट्रवादी आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने यंदाच्या 22 जुलै रोजी एक अनोखा योगायोग जुळून येत आहेत. काय आहे हा योगायोग जाणून घेऊयात सविस्तरपणे...
महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच एक अनोखा योग जुळून येणार आहे. आजपासून 19 दिवसांनी म्हणजेच 22 जुलै रोजी हा योग जुळून येत आहे. जाणून घेऊयात नेमका हा योग आहे तरी काय...
अजित पवार यांनी रविवारी (2 जुलै 2023) रोजी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी 2019 साली निवडून आल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची ही तिसरी वेळ ठरली. तर एकूण पाचव्यांदा अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.
अजित पवारांच्या रुपात महाराष्ट्रात पहिल्यांदाच 2 उपमुख्यमंत्र्यांचा प्रयोग शिंदे सरकारच्या नेतृत्वाखाली राबवला जात आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे दोन्ही नेते उपमुख्यमंत्रीपदावर आहेत.
राज्यातील सरकारमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादीलाही 9 मंत्रीपद देण्यात आलेली आहेत. सध्या शिंदे गट, भाजपा आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 9 मंत्रीपदं देण्यात आली आहेत.
अजित पवारांनी रविवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हणजेच छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अदिती तटकरेंसहीत अन्य 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवार आणि फडणवीस हे दोघेही उपमुख्यमंत्री असल्याने या महिन्याच्या 22 तारखेला एक अनोखा योग जुळून येणार आहे.
22 जुलै रोजी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा म्हणजेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे.
भाजपाचे महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी नागपूरमध्ये झाला. ते यंदा 53 वर्षांचे होतील.
तर अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 चा असून ते यंदा 64 वा वाढदिवस साजरा करणार आहे.
पहिल्यांदाच राज्यात 2 उपमुख्यमंत्र्यांचा प्रयोग राबवण्यात आलेला असताना आजपासून (3 जुलै 2023) अवघ्या 19 दिवसांनी एकाच दिवशी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचा योग जुळून येणार आहे.