चित्रपट ठरला फ्लॉप. कमाई तर सोडाच बजेटही वसूल करता आले नाही. क...
दरवर्षी बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. यामध्ये काही चित्रपट बजेट पेक्षा जास्त कमाई करून रेकॉर्ड बनवतात.
असाच एक चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. हा चित्रपट 100 कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आला होता.
जोरदार प्रमोशन करून देखील हा चित्रपट प्रेक्षकांनी नाकारला. या चित्रपटाला त्याचे बजेटही वसूल करता आले नाही.
आम्ही तुम्हाला ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव 'सेल्फी' आहे. 'सेल्फी' हा एक विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत होते.
खरंतर, अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीचा 'सेल्फी' हा चित्रपट मल्याळम चित्रपट 'ड्रायव्हिंग लायसन्स' चित्रपटाचा हिंदी रिमेक होता.
'ड्रायव्हिंग लायसन्स' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला होता. विशेष म्हणजे, 'सेल्फी' चित्रपटासाठी अक्षय कुमारने कोणतेही मानधन घेतले नाही.
'सेल्फी' चित्रपटाने देशभरात 20.10 कोटी रुपयांची कमाई केली. तर जगभरात फक्त 24.60 कोटी रुपयांची कमाई केली.