PHOTOS

2007 चा हिट चित्रपट 17 वर्षांनंतर होणार पुन्हा प्रदर्शित, बॉक्स ऑफिसवर करणार धमाल

अक्षय कुमार आणि कतरिनाचा 2007 मधील रोमँटिक चित्रपट पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. 

Advertisement
1/7

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांचा 2007 मध्ये रोमँटिक चित्रपट प्रदर्शित झाला होता. अशातच आता हा चित्रपट पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. 

2/7

2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अक्षय आणि कतरिना यांच्या जोडीने खळबळ उडवून दिली होती. या चित्रपटाचे नाव 'नमस्ते लंदन' आहे. 

3/7

'नमस्ते लंदन' चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांना तो खूप आवडला होता. त्यामुळे आता अक्षय कुमारने हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची घोषणा करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 

4/7

या चित्रपटातील गाणीही खूप हिट झाली होती. त्यासोबतच या चित्रपटाच्या स्टोरीने देखील प्रेक्षकांची मने जिंकली होती. दरम्यान, हा चित्रपट 14 मार्च रोजी पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. 

5/7

अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर या चित्रपटासंदर्भातील माहिती दिली आहे. ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, 'या होळीला 'नमस्ते लंदन'ची जादू पुन्हा अनुभवण्यासाठी सज्ज व्हा.

6/7

या चित्रपटातील हिट गाणी आणि संवाद पुन्हा एकदा तुमचे मनोरंजन करतील. चित्रपटगृहात भेटू असं अक्षयने म्हटलं आहे. चाहत्यांनी अक्षयच्या या पोस्टवर लाईक करून आनंद व्यक्त केला आहे. 

7/7

अक्षय आणि कतरिना व्यतिरिक्त या चित्रपटात ऋषी कपूर, नीना वाडिया, उपेन पटेल यांसारख्या कलाकारांनी काम केलं आहे. या चित्रपटात गुरप्रीत घुग्गी, वीर दास आणि रितेश देशमुख सारख्या कलाकारांनी कॅमिओ केला आहे. 





Read More