'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील प्रसिद्ध जोडी म्हणजे राणादा आणि पाटलीण बाई. याच मालिकेतून त्यांना प्रसिद्धी मिळाली.
'तुझ्यात जीव रंगला' फेम अक्षया-हार्दिक हे याच मालिकेतून घराघरात पोहोचले. या मालिकेत अक्षया देवधरने पाटलीण बाई म्हणजेच पाठकबाई आणि हार्दिकने राणादाची भूमिका साकारली होती.
या मालिकेतील त्यांची ऑनस्क्रीन जोडी ही खूपच हिट ठरली होती. मात्र, त्यासोबतच खऱ्या आयुष्यात देखील त्यांची जोडी खूपच हिट ठरली. दोघांनी लग्नगाठ बांधल्यानंतर चाहते देखील खूश होते.
2022 मध्ये दोघांनी गुपचूप साखरपुडा करत चाहत्यांना धक्काच दिला होता. आता त्यांच्या साखरपुड्याला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत.
यानिमित्ताने हार्दिकने अक्षयासाठी इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये अभिनेत्याने दोघांचे साखरपुड्याचे फोटो शेअर केलेत.
त्याने कॅप्शनमध्ये, तो खास दिवस आज पुन्हा आला आहे, ज्यादिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले आणि आजही त्यासर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस. Happy engagement anniversary My love असं म्हटलं आहे. सध्या त्याची ही पोस्ट खूपच चर्चेत आली आहे.
दोघांनी 2 डिसेंबरला लग्न केले आणि नव्या आयुष्याला सुरुवात केली. दोघांच्या लग्नाला आता अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघांचेही सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.