PHOTOS

अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? सोनाराकडे गेल्यावर हे 3 अंक पारखून घ्या, शुद्धतेचा पुरावा लगेच मिळेल

30 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया सण साजरा केला जात आहे. या दिवशी सोनं खरेदी करणं शुभं मानलं जातं. सोन्याचा अर्थ धन-संपत्ती असा होता. त्यामुळं या दिवशी लोक सोनं-चांदी खरेदी करतात. जेणेकरुन घरातील संपत्ती दिवसेंदिवस वाढतच जाईल. पण अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताना थोडं सतर्क राहण्याची गरज आहे. 

Advertisement
1/6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? सोनाराकडे गेल्यावर 'हे' 3 अंक पारखून घ्या, शुद्धतेचा पुरावा लगेच मिळेल
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? सोनाराकडे गेल्यावर 'हे' 3 अंक पारखून घ्या, शुद्धतेचा पुरावा लगेच मिळेल

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करताय जर सावधगिरी बाळगणे खूप गरजेचे आहे. सोनार तुम्हाला काही ठराविक कॅरेटबद्दल सांगेल पण तुम्ही घेताय तो दागिना खरंच तितक्याच कॅरेटचा आहे का? हे कसं तपासाल याची पद्धत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

2/6

तुम्ही खरेदी करत असलेले सोनं किती कॅरेटचं आहे हे तपासण्यासाठी हे 3 अंक असलेले नंबर्स डोक्यात फिट करुन घ्या. त्याचबरोबर तुम्हाला हॉलमार्गिकची पद्धतदेखील समजून घेतली पाहिजे. 

3/6

24 कॅरेटचे सोनं सगळ्यात शुद्ध मानलं जातं. मात्र यापासून दागिने तयार होऊ शकत नाही. 24 कॅरेट सोनं हे फारच मऊ असतं त्यामुळं यापासून दागिने बनवता येत नाहीत. नियमानुसार फक्त, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचेच दागिने बनवता येऊ शकतात. 

4/6

 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 916, 18 कॅरेट दागिन्यांवर 750 आणि 14 कॅरेटच्या दागिन्यांवर 585 असे क्रमांक लिहिलेले असतात. हे अंक पाहून तुम्ही अंदाज बांधू शकता की सोनं किती कॅरेटचं आहे. 22 कॅरेट सोनं 91.66 टक्के इतकं असतं. 18 कॅरेट सोन्यात 75 टक्के आणि 14 कॅरेटमध्ये 58.1 टक्के सोनं असतं. त्याचबरोबर अन्य धातु मिसळून दागिने तयार केले जातात. 

 

5/6

आजकाल नकली हॉलमार्किंगचे प्रकारही समोर येत आहेत. अशातच खरं हॉलमार्किगची ओळख पटवणे आलं पाहिजे. दागिन्यांवर BISचा त्रिकोणी निशाण पाहा. सोन्याने कॅरेट पाहा. 6 अंकी हॉलमार्क कोड चेक करा. 6 अंकांच्या कोडमध्ये डिजीट्स आणि लेटर असतात. याला हॉलमार्क यूनीक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच HUID असं म्हणतात. हा नंबर हॉलमार्किंग केल्यांनंतर प्रत्येक दागिन्याला दिला जातो. एका HUID नंबरवर दोन दागिने खरेदी करता येत नाहीत

6/6

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने तयार केलेल्या बीआयएस केअर अॅपच्या मदतीने तुम्ही दागिने तपासू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये अॅप इन्स्टॉल करावे लागेल. यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, फोन नंबर आणि ईमेल आयडी द्यावा लागेल आणि तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी ओटीटी द्वारे द्यावा लागेल. यानंतर तुम्ही अ‍ॅप वापरू शकता. दागिन्यांच्या पडताळणीसाठी, तुम्ही 'Verify HUID' द्वारे दागिन्यांचा HUID क्रमांक तपासू शकता.

 





Read More