Moti Soap Alarm kaka: आलार्म काका म्हणजे मराठीतील ज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर. त्यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात काम केले आहे. पण ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’ या जाहिरातीमधील ‘अलार्म काका’ म्हणून ते लोकप्रिय झाले.कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘गेम विथ अनुपम खेर’, ‘दोस्ती यारीयां मनमर्जिया’ , ‘सास बहू और सेन्सेक्स’, ‘लंच बॉक्स’, ‘एक थी डायन’, ‘एक व्हिलन’ यासारख्या अनेक चित्रपटांत ते झळकले होते.
दिवाळी जवळ आली की प्रत्येकाला आलार्म काकांच्या जाहिरातीची नक्की आठवण येते.
या जाहिरातीत 'उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली' असे म्हणत आलार्म काका चाळकऱ्यांना उठवताना दिसतात.
यानंतर लहान मुलगा त्यांचा वारसा पुढे चालवतो, असे त्या जाहिरातीत दिसते. आपण सर्वांनीच ही जाहिरात पाहिली असेल.
हे आलार्म काका म्हणजे मराठीतील ज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर. त्यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात काम केले आहे.
पण ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’ या जाहिरातीमधील ‘अलार्म काका’ म्हणून ते लोकप्रिय झाले.
कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘गेम विथ अनुपम खेर’, ‘दोस्ती यारीयां मनमर्जिया’ , ‘सास बहू और सेन्सेक्स’, ‘लंच बॉक्स’, ‘एक थी डायन’, ‘एक व्हिलन’ यासारख्या अनेक चित्रपटांत ते झळकले होते.
अनेक नाटकांमध्येही त्यांनी काम केले. त्यासोबत काही चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले.
चित्रपटच नव्हे तर करमरकर हे जाहिरातींमध्येही दिसले. इंडियन ऑइल, पेप्सीगोल्ड, हेन्ज टोमॅटो केचप, लिनोवो कंप्युटर्स, एशियन पेंट यासारख्या जाहिरातीत त्यांनी काम केले.
'आलार्म काका' म्हणजेच विद्याधर करमरकर यांचे 21 सप्टेंबर 2021 रोजी वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले.
मुंबईतील विलेपार्ले येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
'आलार्म काका' आपल्यात नसले तरी मोती साबणाच्या जाहिरातीच्या रुपातून सर्वांच्या कायम आठवणीत राहतील.