PHOTOS

Medicine Alert: एकदोन नव्हे तब्बल 59 औषधं प्राणघातक; तुम्ही यापैकी कोणती वापरत नाही ना?

Medicine Alert: अनेक मोठ्या कंपन्यांकडून तयार करण्यात येणारी अशीच काही औषधं पुन्हा एकदा गुणवत्ता चाचणीचा टप्पा ओलांडू शकलेली नाहीत. ज्यामुळं या 59 औषधांच्या बाबतीत केंद्र औषधी मानक नियंत्रण संघटनेनं अलर्ट जारी केला आहे. 

 

Advertisement
1/7
गुणवत्ता चाचणी
गुणवत्ता चाचणी

CDSCO च्या माहितीनुसार गुणवत्ता चाचणीतील निकषांची पूर्तता ही औषधं करू शकलेली नाहीत. या औषधांच्या सेवनामुळं शरीराला हानी पोहोचत असल्यामुळं आता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 

2/7
प्रमाणपत्र
प्रमाणपत्र

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक प्रतिष्ठित कंपन्यांत्या 59 औषधांना गुणवत्तेच्या निकषांना अनुसरून नसल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं. तब्बल 1105 औषधांच्या चाचणीमध्ये ही 59 औषधं सपशेल अपयशी ठरली. 

3/7
औषधांची चाचणी
औषधांची चाचणी

सूत्रांच्या माहितीनुसार चाचणमध्ये सील लेबल नसणाऱ्या दोन बाटल्यांचे नमुने सापडले असून, ते टाइगेसाइक्लिन 50 मिलीग्राम होते.  फेनोलिक जंतुनाशक फ्लोअर क्लिनरही या चाचणीत अपयशी ठरलं. 

4/7
औषधांची नावं
औषधांची नावं

गुणवत्ता चाचणीमध्ये अपयशी ठरलेल्या या औषधांमध्ये सेफिक्सिम ओरल सस्पेंशन आयपी, एमोक्सिसिलिन, पोटेशियम क्लॅवुलनेट अशा औषधांची नावं आहेत. 

 

5/7
डोमपरिडोन
डोमपरिडोन

याशिवाय लॅक्टिक अॅसिड बॅसिलस टॅबलेट, रबेप्राजोल सोडियम (एंटरिक कोटेड) आणि डोमपरिडोन (सस्टेन्ड रिलीज) कॅप्सूल (20) या औषधांचा समावेश आहे. 

 

6/7
डिक्लोफेनाक सोडियम टॅबलेट
डिक्लोफेनाक सोडियम टॅबलेट

इतकंच नव्हे डिक्लोफेनाक सोडियम टॅबलेट आईपी 50 एमजी, एल्बेंडाजोल टॅबलेट आयपी. 400 मिलीग्राम, ओफ्लॉक्सासिन वरही ही कारवाई झाली आहे. 

 

7/7
नावं लक्षात ठेवा
नावं लक्षात ठेवा

यादीत ऑर्निडाजोल, इट्राकोनाजोल आणि क्लोबेटासोल प्रोपियोनेट क्रीम (डर्मा -आरएक्स क्रीम), विटामिन सी (ऑरेंज सिरप) शामिल ही औषधंसुद्धा असल्याचं सांगण्यात येत आहे.   

 





Read More