PHOTOS

'या' 6 सुपरहिट चित्रपटांना आलिया भट्टने दिलेला नकार; बॉक्स ऑफिसवर केली त्यांनी कोटींची कमाई

आलिया भट्ट ही सध्या बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया बॉलिवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. पाहूयात आलियाने कोणत्या कोणत्या चित्रपटांना नकार दिलेला. 

Advertisement
1/8

आलियाने आपल्या कारकिर्दीत 'गंगूबाई काठियावाडी', 'डार्लिंग्स', 'ब्रह्मास्त्र', 'रॉकी और रानी की प्रेम कहानी आणि 'जिगरा' यांसारखे यशस्वी चित्रपट केले. मात्र, काही अशा स्क्रिप्ट्सही होत्या ज्या तिने नाकारल्या आणि त्या नंतर बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरल्या. जाणून घेऊयात अशाच काही हिट चित्रपटांविषयी, जे आलियाने नाकारले आणि नंतर ते इतर कलाकारांनी गाजवले.

2/8
1. नीरजा (2016)
1. नीरजा (2016)

सोनम कपूरचा सर्वात गाजलेला चित्रपट 'नीरजा' सुरुवातीला आलिया भट्टला ऑफर करण्यात आला होता. पण काही वैयक्तिक किंवा स्क्रिप्टवरील कारणांमुळे तिने नकार दिला. हा चित्रपट सोनमच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरला आणि तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

3/8
2. गोलमाल अगेन (2017)
2. गोलमाल अगेन (2017)

रोहित शेट्टीच्या 'गोलमाल' फ्रेंचायझीमध्ये सहभागी होणं हे प्रत्येक अभिनेत्यासाठी मोठी संधी मानली जाते. 'गोलमाल अगेन'मध्ये परिणीती चोप्राने भूमिका साकारली. पण ही भूमिका सुरुवातीला आलियाला ऑफर झाली होती. तिने दुसऱ्या प्रोजेक्ट्समुळे या चित्रपटाला नकार दिला.

4/8
3. राबता (2017)
3. राबता (2017)

सुशांत सिंग राजपूतसोबत 'राबता' या रोमँटिक-अ‍ॅक्शन फिल्ममध्ये काम करण्याची संधी आलियाकडे होती. पण तिने ही भूमिका नाकारली आणि नंतर कृती सेनन या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री झाली.

5/8
4. ठग्स ऑफ हिंदुस्तान (2018)
4. ठग्स ऑफ हिंदुस्तान (2018)

आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी आलिया भट्टने सोडली. हा बिग-बजेट चित्रपट असला तरी समीक्षकांकडून खूप कमी प्रतिक्रिया मिळाल्या. चित्रपटाने सुरुवातीला कमाई केली. पण शेवटी अपयशी ठरला. त्यामुळे यावर आलियाचा निर्णय योग्य ठरला असंही काहींना वाटतं.

 

6/8
5. साहो (2019)
5. साहो (2019)

दक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत 'साहो' या अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपटात काम करण्यासाठी सुरुवातीला आलिया भट्टला विचारण्यात आले होते. मात्र, स्क्रिप्ट तिच्या मनासारखी नसल्याने तिने हा प्रोजेक्ट नाकारला. नंतर श्रद्धा कपूर या भूमिकेत झळकली.

7/8
6. शेरशाह (2021)
6. शेरशाह (2021)

'शेरशाह' या युद्धपटात आलिया भट्टला कियारा आडवाणीची भूमिका ऑफर करण्यात आली होती. पण आलियाने हा चित्रपट साइन केला नाही. हा चित्रपट नंतर सुपरहिट ठरला आणि कियाराला त्यासाठी प्रचंड प्रशंसा मिळाली.

8/8

अभिनय क्षेत्रात योग्य स्क्रिप्ट निवडणे ही मोठी जबाबदारी असते. काही वेळा कलाकार चुकून एखादी संधी गमावतात, तर कधी ती एक चांगलीच गोष्ट ठरते. आलिया भट्टने हे चित्रपट नाकारले असले तरी तिने तिच्या इतर भूमिकांद्वारे स्वतःचं स्थान अजून मजबूत केलं आहे.





Read More