PHOTOS

Anant Ambani Radhika Merchant Engagement party : आलिया- रणबीरचं ठीक पण अंबानींच्या पार्टीला शाहरुखसोबत आलेली 'ती' कोण?

  मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा सर्वात धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याचा साखरपुडा राधिका मर्चंट (Radhika merchant) हिच्यासोबत नुकताच पार पडला. 

Advertisement
1/6

अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika merchant) त्यांच्या कुटुंबीयांसह ज्यावेळी स्वगृही परतले तेव्हा त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांच्यावर गुलाबपुष्पाच्या पाकळ्यांच्या वर्षाव करण्यात आला. चहूबाजुंनी त्यांना शुभेच्छा देण्यात येत होत्या. हे पाहून राधिका आणि अनंत भारावून गेले. 

 

2/6

एका नव्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या या जोडीला शुभेच्छा देण्यासाठी अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची पत्नी आलिया भट्टसुद्धा आली होती. यावेळी राहा मात्र कुठेच दिसली नाही. दिग्दर्शक आयान मुखर्जीसुद्धा यावेळी अँटिलियामध्ये दिसला. 

 

3/6

अभिनेता रणवीर सिंग यानं या पार्टीसाठी आपल्या नेहमीच्याच धडाकेबाज शैलीत एंट्री केली. यावेळी त्याच्यासोबत दीपिका मात्र पार्टीसाठी आली नव्हती. 

4/6

सुरेख अशा गुलाबी रंगाच्या जाळीदार साडीमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर या पार्टीसाठी आली होती. तिचा हा लूक सर्वांनाच आवडला. 

5/6

व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत अभिनेता सलमान खान (Salman khan) यानंही पार्टीला हजेरी लावली होती. पण, यावेळी तो छायाचित्रकारांसमोर पोझ देताना दिसला नाही. 

6/6

पार्टीमध्ये चांगलीच हवा झाली ती मात्र बॉलिवूडचा किंग, अभिनेता (Shah rukh khan) शाहरुख खान याच्या येण्यानं. तो या पार्टीसाठी पत्नी गौरीसोबत येईल अशी अपेक्षा होती. पण, तसं झालं नाही. यावेळी शाहरुख त्याची मॅनेजर गौरी ददलानी हिच्यासोबत आली. माध्यमांनी गौरीची झलक टीपली पण किंग खानचा फोटो मात्र त्यांना कॅमेरात कैद करता आला नाही. 





Read More