स्विफ्टचे पहिले मॉडेल २००५ मध्ये लॉन्च झाले. त्यानंतर २०११ ला याचे सेकंड जनरेशन मॉडेल लॉन्च झाले. आता मारूती थर्ड जनरेशन मॉडल घेऊन येत आहे.
नव्या स्विफ्टमध्ये एक्सटीरियर पासून सर्व गोष्टी अपग्रेड केलेल्या आहेत. नव्या स्विफ्टमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. मोठ्या ग्रिलसहीत या गाडीचा फ्रंट लूक अपग्रेड केला आहे.
स्विफ्टमध्ये नवीन हेडलाईट आणि नवीन टेल-लाईट्स देण्यात आल्या आहेत. कारचे केबिन पूर्णतः वेगळे आहे.
स्विफ्टमध्ये नवीन अपमार्केट स्टीयरिंग व्हील आणि टू-पॉड इंस्ट्रूमेंट क्लस्टर लावण्यात आले आहेत. याशिवाय यात अप्पल कारप्ले सोबत टचस्क्रीन इंफोसिस्टम, मिरर लिंक, पॅडल शिफ्टर्स आणि अन्य फिचर्स देण्यात आले आहेत.
नवीन स्विफ्टमध्ये लेगरूम आणि लगेज स्पेस वाढवण्यात आली आहे. स्पेसमध्ये एकूण २५% वाढ करण्यात आली आहे.
नवीन स्विफ्टची किंमत ४.७५ लाख रुपयांपासून ८ लाखांपर्यंत जाऊ शकते.
भारतीय बाजारात तयार केलेली स्विफ्ट १.२ लीटर पेट्रोल आणि १.३ लीटर डिझेल इंजिनासह येईल. नविन स्विफ्ट, बलेनोच्या प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आली आहे. ती १०-१५% हलकी आहे.
िझायर २५.४ किलोमीटर प्रति लीटर असा मायलेज देईल. स्विफ्ट डिझायरच्या तुलनेत अधिक स्पोर्टी आहे. सुमारे २६ किलोमीटर प्रति लीटर इतका मायलेज मिळण्याची आशा आहे.