स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून अनेक ई कॉमर्स साईट्सवर फ्रीडम सेल्सला सुरूवात झाली आहे. अमेझॉनवर आजपासून 12 ऑगस्टपर्यंत खास सेल सुरू राहणार आहे. यामध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर खास सूट देण्यात आली आहे. यासोबतच एसबीआयच्या कार्ड धारकांना खास सूट देण्यात आली आहे.
हवाई पी20 लाइट : अमेझॉन फ्रीडमसेलमध्ये (Huawei P20 Lite) स्मार्टफोनवर 6 हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे. हा फोन सेलमध्ये 16,999 रूपयांना मिळणार आहे. हवाईच्या या स्मार्टफोन मध्ये 16+2 MP रियर कॅमेरा, 24 MP फ्रंट कॅमेरा , 5.84 इंच टचस्क्रीन डिस्पले, 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज आहे. फोनमध्ये किरिन 659 प्रोसेसर आणि 3000 mAh बॅटरी आहे.
सॅमसंग गैलेक्सी ए6 : 25,500 रुपयांचा (Samsung Galaxy A6) फोन अमेझॉन सेलमध्ये 20,990 रूपयांमध्ये मिळणार आहे. मे 2018 मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या सॅमसंगच्या या फोनमध्ये 1.6 गीगा हर्टज ऑक्टाकोर प्रोसेसर , 3 GB रॅम आहे. फोनमध्ये 32 GB इंटरनल मेमरी माइक्रो एसडी कार्ड च्या मदतीने 256 GB पर्यंत वाढवले जाते. सेलमध्ये 64 GB रॅमवाला वेरिएंट देखील उपलब्ध आहे. फोन मध्ये 16 MP रियर आणि 5 MP फ्रंट कॅमेरा आहे.
ओप्पो एफ 7 : 6.23 इंच फुल एचडी डिस्पले ओप्पो एफ 7 (Oppo F7) मध्ये मीडिया टेक हीलियो P60 प्रोसेसर आहे. 128 GB इंटरनल स्टोरेजचा हा फोन 23,990 रुपयांत मिळणार आहे. फोनमध्ये 16 MP रियर आणि 25 MP फ्रंट कॅमेरा,128 GB इंटरनल स्टोरेज आहे तर 6 GB रॅम आणि 3400 mAh बॅटरी आहे.
वीवो नेक्स : काही दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आलेला वीवो नेक्स (Vivo Nex) स्मार्टफोन सेलमध्ये 44,990 रुपयांमध्ये मिळणार आहे. या फोनची किंमत 47,990 रुपये आहे. 6.59 इंच टचस्क्रीन डिस्पले वाल्या या फोनमध्ये 2.2 गीगा हर्टज चा ऑक्टाकोर प्रोसेसर, 8 GB रॅम, 128 GB इंटरनल स्टोरेज आहे फोन मध्ये 12 MP प्राइमरी रियर कॅमेरा आणि 8 MP का फ्रंट कॅमेरा आहे.
सान्यो 43 इंच फुल एचडी टीवी : सान्योचा 43 इंच वाला XT-43S7100F टीवी फुल एचडी रिज्यूलूशनचा आहे. या टीव्हीमध्ये 178 डिग्री अॅन्गल व्यू आहे. 38,990 रुपयांचा हा टीव्ही 19,990 रुपयांमध्ये मिळणार आहे.
बीपीएल फुल एचडी LED TV : 1920x1080 पिक्सल रिज्यूलूशन असणारा बीपीएलचा फुल एचडी एलईडी टीवी मध्ये 178 डिग्रीचा व्यूईंग अॅन्गल आहे. बीपीएलच्या या टीव्हीमध्ये 16W ऑडियो आउटपुट सोबत 60 हर्टज रिफ्रेश डिस्प्ले रेट आहे. सेलमध्ये हा टीव्ही 18,490 रूपयांमध्ये मिळणार आहे.
सॅमसंग 32 इंच स्मार्ट टीवी : अमेझॉनच्या सॅमसंगचा एम सीरीज वाला 32 इंचचा एलईडी स्मार्ट टीवी 21,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. बाजारात या टीव्हीची किंमत 33,990 रूपये आहे.सॅमसंगच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये 20W ऑडियो आउटपुट सोबत 2 एचडीएमआई इनपुट आणि यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे.