Amazon Summer Sale 2023 Offer: 'अॅमेझॉन'च्या वेबसाईटवर सध्या समर ऑफर्सअंतर्गत अनेक गोष्टींवर घसघशीत सूट दिली जात आहे. आज म्हणजेच 11 मे हा अॅमेझॉनच्या सेलचा शेवटचा दिवस आहे. या सेलदरम्यान स्मार्टफोनवर मोठी सवलत दिली जात असल्याने फोन फार कमी किंमतीत उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे सॅमसंगचा गॅलेक्सी एम 14 5G हा फोन अगदी स्वस्तात मिळतोय. जाणून घेऊयात या ऑफरसंदर्भात...
Samsung Galaxy M14 5G हा दमदार फोन भारतामध्ये मागील महिन्यात लॉन्च झाला. सध्या फोनचे दोन व्हर्जन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 4 जीबी + 128 जीबी व्हर्जन आणि 6 जीबी + 128 जीबी व्हर्जन. (सर्व फोटो - सॅमसंगच्या वेबसाईटवरुन साभार)
स्पेसिफिकेशन्ससंदर्भात सांगायचे झाल्यास फोनची स्क्रीन 6.6 इंचाची फूल एचडी स्क्रीन आहे. स्क्रीनचं रेझोल्यूशन 2408 x 1080 पिक्सल्स इतकं असून PLS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये Android 13 कस्टम स्क्रीन आणि 6 जीबी रॅमच्या व्हेरिएंटमध्ये Exynos 1330 ऑक्टा-कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे.
Samsung Galaxy M14 5G वर कंपनीने नो-कॉस्ट EMI चा पर्यायही दिला आहे. सिव्हर, ब्लू आणि स्मोकी टील या रंगांचा पर्याय कंपनीने दिला आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये रेअर 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 2 मेगापिक्सल डेफ्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे.
सेल्फीसाठी फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला असून फोनची बॅटरी 6 हजार एमएएचची आहे. फोनमध्ये 25 वॅट फास्ट चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये रेअर 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 2 मेगापिक्सल डेफ्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे.
4 जीबी + 128 जीबी व्हर्जन 13 हजार 990 रुपयांना तर 6 जीबी + 128 जीबी व्हेरिएंट 14 हजार 990 रुपयांना उपलब्ध आहे.
काही बँकांच्या क्रेडीट कार्डवर हा फोन विकत घेतल्यास सूट दिली जात आहे. यापैकी अनेक कार्डांवर 1500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काऊंट मिळत आहे. त्यामुळे ही सूट ग्राह्य धरल्यास फोनची किंमत 12 हजार 490 रुपये इतकी असेल. जुना फोन एक्सचेंज केल्यास हा नवा 5G फोन 13 हजार 100 रुपयांना विकत घेता येईल.