World Most Beautiful Woman : जगातील सर्वात सुंदर कोण याचं उत्तर अखेर मिळालं आहे. वैज्ञानिकांनी हीच ती महिला असं मान्य केलंय.
जगातील सर्वात सुंदर ती कोण, यासाठी काय मापदंड आहेत असा प्रश्न अनेक वेळा पडतो.
एका ब्रिटीश सर्जनने जगातील सर्वात सुंदर महिला कोण यांचा शोध घेतला आहे.
ब्रिटीश सर्जन म्हणाले की, फेशियल मॅपिंगच्या अत्याधुनिक तंत्राद्वारे त्यांना एका अमेरिकन अभिनेत्रीचा चेहरा हा सर्वात सुंदर असल्याचा दिसून आलंय.
अत्याधुनिक फेस मॅपिंग डेटानुसार एम्बर हर्ड ही जगातील सर्वात सुंदर महिला आहे. या यंत्रानुसार 91.85 टक्के तिचा चेहरा हा सुंदर महिल्या संकल्पनेत अचूक बसतो.
डॉ. ज्युलियन जी सिल्वा असं या सर्जनचं नाव आहे. ते म्हणतात की, या अभिनेत्रीचे डोळे, भुवया, नाक, ओठ, हनुवटी, जबडा आणि चेहऱ्याचा आकार सोनेरी गुणोत्तराच्या जवळ पोहोचतो.
त्यांनी सांगितलं की, एखाद्या चेहऱ्याचं सौंदर्य मोजण्यासाठी त्याच्या चेहऱ्याची लांबी आणि रुंदी मोजली जाते.
सौंदर्य मोजण्यासाठी विज्ञानात एक पद्धत असून त्याला लेटेस्ट फेशियल मॅपिंग तंत्रज्ञान असं म्हणततात.