Shravan Somvar 2025 : अंबरनाथ येथील शिवमंदिर अत्यंत प्राचीन मंदिर आहे. संपूर्ण भारतातून भाविक आणि पर्यटक हे मंदिर पाहण्यासाठी येतात.
मुंबईजवळ 964 वर्ष जुनं प्राचीन शिवमंदिर आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात लोक्परिय शिवमंदिर आहे. या मंदिराबाहेर थेट पंचवटीला घेऊन जाणारी रहस्यमयी गुहा आहे.
मंदिराच्या गर्भगृहाजवळ एक गरम पाण्याचे तळे आहे. त्याच्या जवळ एक गुहा देखील आहे, जी पंचवटीला घेऊन जाते असे देखील सांगितले जाते.
मंदिराच्या गर्भगृहाजवळ एक गरम पाण्याचे तळे आहे. त्याच्या जवळ एक गुहा देखील आहे, जी पंचवटीला घेऊन जाते असे देखील सांगितले जाते.
हे मंदिर खूप पुरातन काळतील असल्याकारणाने या मंदिरात दररोज अनेक भाविक भेट देतात. हे एक जागृत देवस्थान असल्याचा दावा भाविक करतात.
महाशिवराञी आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पहायला मिळते.
अंबरनाथमधील शिवमंदिर हे शिल्पजडीत आहे. मंदिरातील स्तंभांवर अनेक देवी-देवतांचे शिल्प साकारलेले आहेत. या मंदिराच्या शेजारी झुळझुळ वाहणारा पाण्याचा ओढा आहे.
या मंदिरांची निर्मीती शिलाहार राज घराण्यातील माम्वाणी राजाच्या काळात झाली आहे. हे मंदित इ.स. 1060 मध्ये बांधण्यात आल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो.
अंबरनाथमध्ये असलेल्या प्राचीन शिव मंदिराला भेट द्यायची असेल तर हे मंदिर अंबरनाथ रेल्वेस्थानकापासून साधारण 1KM अंतरावर आहे. अंबरनाथ रेल्वे स्टेशनवरुन रिक्षा पकडून येथे जाता येते.