फिल्म इंडस्ट्रीतील काहीच व्यक्तीच्या डेटिंगच्या अफवा व्हायरल होत असतात. ज्यामुळे चाहत्यांना देखील धक्का बसतो. अशाच एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या डेटिगच्या बातम्या सध्या समोर येत आहेत.
बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीचे डेटिंगचे फोटो व्हायरल झाले आहेत. जे पाहून सर्वांना धक्का बसला आहे.
वयाच्या 49 व्या वर्षी ही अभिनेत्री 19 वर्षांनी लहान असणाऱ्या बिझनेसमनला डेट करत असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत.
आम्ही तुम्हाला सांगत आहोत अभिनेत्री अमीषा पटेलबद्दल, जिने 24 वर्षांपूर्वी ह्रतिक रोशनसोबत करिअरला सुरुवात केली होती.
अमीषा पटेलने स्वत: तिच्या सोशल मीडियावर एका व्यक्तीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे सोशल मीडियावर डेटिंगची अफवा पसरली आहे.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमधील व्यक्तीचे नाव निर्वाण बिर्ला आहे. जो एक मोठा उद्योगपती आहे. त्यासोबतच तो अमीषापेक्षा 19 वर्षांनी लहान आहे.
फोटोमध्ये अमीषा निर्वाण बिर्ला यांच्या मांडीवर बसून पोज देताना दिसत आहे. त्यासोबतच दोघांच्या चेहऱ्यांवर हसू दिसत आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, दुबई-माझ्या मित्रांसोबत कालची संध्याकाळ किती छान होती असं तिने म्हटलं आहे.