नागा चैतन्यशी रिलेशनशिपच्या चर्चा असतानाच अभिनेत्रीनं शेअर केले लग्नाचे फोटो. फोटो पाहणारेही हैराण.... एकाएकी तिनं लग्न केलं? अनेकांना पडला एकच प्रश्न
Naga chaitanya Rumoured girlfriend shobhita shared wedding photos : अभिनेता नागा चैतन्य (Naga chaitanya ) यानं चार वर्षांचं वैवाहिक नातं तोडत अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला (Samantha Ruth prabhu disease) घटस्फोट दिला. मैत्री, प्रेम आणि त्यानंतरच्या वैवाहिक नात्याचे पाश तोडून या दोघांनीही एका वेगळ्या आयुष्याची सुरुवात केली. समंथा तिच्या कामावर लक्ष केंद्रीत करु लागली. 'चै'सुद्धा तुलनेनं धीम्या गतीनं का असेना, पण त्याच्या या नव्या आयुष्यात रुळला.
पाहता पाहता त्याचं नाव एका अभिनेत्रीशी जोडलं गेलं. ही अभिनेत्री म्हणजे शोभिता धुलिपाला (Shobhita Dhulipala). Made in heaven या वेब सीरिजमुळं (Web series) प्रकाशझोतात आलेल्या शोभितानं तिच्या रुपानं सर्वांनाच भुरळ पाडली, नागा चैतन्य हासुद्धा त्यातलाच एक.
अनेकांच्या मनेत तिला त्याच्या घरीसुद्धा अनेकदा पाहिलं गेलं होतं. अद्यापही चै किंवा शोभिता या दोघांपैकी कुणीही त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नाही. किंबहुना समंथाच्या आजारपणामुळं (Samantha illness) चै त्याच्या या Ex Wife ला भेटण्यासाठी जाऊ शकतो असा अंदाजही अनेकांनी वर्तवला आहे. त्यामुळं कोणत्याही नात्याची अधिकृत माहिती कोणाकडेच नाही. असं असतानाच त्याच्या कथित प्रेयसीचे अर्थात शोभिताचे Wedding Photos समोर आले आहेत. शोभितानंच तिच्या (Instagram) इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. फोटो पाहताक्षणी अनेकांना तर धक्काच बसला.
दुबईमध्ये (Dubai) जाऊन अत्यंत थाटामाटात हा सोहळा पार पडल्याचं ते क्षण पाहून लक्षात आलं. पण, खरं गुपित तर तिच्या INSTA POST च्या कॅप्शनमधून समोर आलं. कारण शोभिताचे हे फोटो तिच्या खऱ्याखुऱ्या लग्नसोहळ्यातील नाहीत, तर तिच्या एका जाहिरातीचा भाग आहेत. दुबईच्या पर्यटनासाठी आणि एका मासिकासाठी केलेल्या फोटोशूटमधील ही एक झलक.
शोभिता इथे एकदा लेहंग्यामध्ये दिसते, तर कुठे ती ब्लड रेड कलरच्या बॅकलेस वनपिसमध्ये दिसत आहे. शोभिताचं सौंदर्य या फोटोशूटला खऱ्या अर्थानं चार चाँद लावत आहे असं म्हणायला हरकत नाही. किंबहुना प्रत्यक्षात ती वधुरुपात कधी समोर येणार हा जरी प्रश्न असला तरीही जाहिरातीच्या निमित्तानं का असेना ती वधुरुपात कशी दिसेल याचा अंदाज मात्र नेटकऱ्यांना आला आहे. हो ना? (सर्व छायाचित्र- शोभिता धुलिपाला/ Instagram)