Amisha Patel Birthday: कहो ना प्यार हैं या चित्रपटात अभिनेत्री अमिषा पटेल हिनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. त्यामुळे सर्वत्र चर्चा होती ती म्हणजे हृतिक रोशन आणि अमिषा पटेल हिच्या केमेस्ट्रीची. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन 23 वर्षे झाली आहेत परंतु आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आहेत.
2000 च्या सुरूवातीच्या काळात अनेक अभिनेत्रींचा अभिनय लोकप्रिय ठरला होता. त्यात अभिनेत्री अमिषा पटेलचीही प्रचंड क्रेझ होती. 'कहो ना प्यार हैं' या चित्रपटामुळे तिच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली होती.
त्यानंतर तिचे अनेक चित्रपट हे गाजले. तिचा 'गदार' हा चित्रपटही गाजला. आता या चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यावर्षी तो प्रदर्शितही होणार आहे.
परंतु त्याचबरोबर तिची अनेक प्रेमप्रकरणंही गाजली होती. त्यामुळे तिची ही प्रेमप्रकरणंही बरीच चर्चेत राहिली होती. तेव्हा आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. आमिषा आज 48 वर्षांची झाली परंतु तिच्या फिटनेसबद्दल ती आजही ओळखली जाते.
प्रिटी झिंटा या अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडशी तिचे नावं जोडले गेले होते. त्यानंतर सुष्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंड दिग्दर्शक विक्रम भट्टशीही तिचे नावं जोडले गेले होते. विक्रम भट्टशी असलेलं तिचं रिलेशनशिप हे सगळ्यात जास्त वादग्रस्त होते.
तिचे नाव चक्क रणबीर कपूरशीही जोडले गेले होते. त्यामुळे तिचीही बरीच चर्चा रंगली होती. सोबतच एका पाकिस्तानी अभिनेत्यालाही ती डेट करत होती.